युद्धविराम की राजकीय खेळी? हमासची युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या आरोपांवर प्रतिक्रिया ; मोठा कट रचला जात असल्याचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हमासने अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत दोन्ही देश मोठा कट रचत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागेन शनिवारी (१८ ऑक्टोबर) हमास गाझातील नागरी भागांवर हल्ले करुन युद्धविरामाचे उल्लंघन करत अशल्याचा आरोप केला होता. तसेच हमासविरोधात योग्य ती कारवाई देखील केली जाईल असा इशारा देण्यात आला होता.
पण रविवारी(१९ ऑक्टोब) हमासने या आरोपांना खोटे ठरवले आहे. हमासने जारी केलेल्या निवेदनत अमेरिकेचे आरोप पूर्णत: खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. हमासने ते युद्धबंदीचे पालन करत असल्याचे सांगितले असून इस्रायलवरच युद्धविरामाच्या उल्लंघनाचा आरोप केला आहे. हमासने इस्रायल गाझातील पॅलेस्टिनी लोकांवर आक्रमण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही हमासने केला आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान इस्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये दक्षिणी भागात हल्ले सुरु केले आहे. इस्रायलच्या मते, हमासने यलो लाईच्या पलीकजे जाऊन त्यांच्या सैनिकांनर हल्ला केला होता. यामुळे त्यांनी देखील प्रत्युत्तर दाखल हल्ले केले आहे. तसेच इस्रायलने हमासवर राफा शहारात अँटी टँक क्षेपणास्त्र आणि गोळीबार केल्याचाही आरोप केला आहे.
या घटनांमुळे सध्या गाझातील परिस्थिती भयंकर होताना दिसत आहे. यामुळे गाझा रहिवाशांसमोर पुन्हा एकदा संघर्षाचे मोठे ढग उभे राहिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा शांतता प्रक्रिया देखील धोक्यात आली आहे. ट्रम्प यांनी हमासला हिंसा थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तर असे न केल्यास त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलावी लागतील असे म्हटले आहे.
प्रश्न १. अमेरिका इस्रायलच्या युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या आरोपांवर हमासने काय प्रतिक्रिया दिली?
हमासने इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या आरोपांना फेटाळले असून मोठा कट रचला जात असल्याचे म्हटले आहे.
प्रश्न २. हमासने इस्रायलवर काय आरोप केला आहे?
हमासने इस्रायलवर त्यांनीच युद्धबंदीचे उल्लंघन केला असल्याचा आरोप केला आहे.
फ्रान्स हादरला! सात मिनिटांत पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून मौल्यवान दागिन्यांची चोरी






