महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा एमआयएम पक्षानेही तयारी सुरू केली असून पक्षाने या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अकबर ओवेसी यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच निवडणूक रणनिती आखण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने एमआयएमने स्वबळाचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.