पुराणांमध्ये अमरत्व अनेकांना मिळाले असल्याचे वाचवण्यात येते. अमरत्व म्हणजे कधीही मरण नाही! असे सात चिरंजीव पुण्यात्मा आजही या पृथ्वीतलावर हजारो, लाखो वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तर कधी काळी मिळलेल्या श्रापामुळे, त्यांचे अस्तित्व आजही पृथ्वीतलावर टिकून आहे.
फोटो सौजन्य - Social Media
अश्वत्थामा चिरंजीव आहे. पांडवांची संतती नष्ट करायला गेला आणि नशिबी भगवान श्री कृष्णाकडून श्राप मिळाला. म्हणतात हिमालयाच्या डोंगररांगेत आजही त्याचे वास्तव्य आहे.
भगवान हनुमानाला घनदाट जंगलात पहिल्याच दावा अनेकांनी केलाय. म्हणतात भगवान रामाने त्यांना “जोपर्यंत रामाचे नाव पृथ्वीवर घेतले जाईल, तोपर्यंत तू जगत राहशील.” असे वरदान दिले आहे.
ज्यांच्या हातून महाभारतही रचना लिहली गेली, स्वयं प्रभू विष्णूचे अवतार आणि वेदांचे जनक वेद व्यास, ज्ञानाच्या प्रसारासाठी आजही आपल्यात आहेत.
प्रल्हादाचा नातू आणि ज्याच्यासाठी विष्णूने वामन अवतार घेतला तो राजा बळी आज ही पृथ्वीवर चिरंजीव आहे. तसेच भगवान परशुरामही अमर आहेत.
धर्माचा खरा पालनकर्ता, रावणाचा भ्राता आणि रामभक्त बिभीषण धर्माच्या प्रसारासाठी आजही जिवंत आहे. तर कौरवांच्या वंशाचे गुरु कृपाचार्य त्यांच्या घोर तपश्चर्येमुळे अमर आहेत.