Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीतून सहा गॅरंटी; त्यांच्या पत्नी सुनीता यांनी केले वाचन

इंडिया आघाडीच्या सभेत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी भाषण केलं. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश देखील जनतेला वाचून दाखवला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2024 | 02:40 PM
अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीतून सहा गॅरंटी; त्यांच्या पत्नी सुनीता यांनी केले वाचन
Follow Us
Follow Us:

दिल्ली – आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाली आहे. त्यांच्या अटकेची मुदतवाढ देखील झाली असल्यामुळे ते अद्याप कोठडीमध्ये आहेत. याविरुदध इंडिया आघाडी आक्रमक झाली असून २८ पक्ष दिल्लीमध्ये एकत्र आले आहेत. यावेळी झालेल्या सभेत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी भाषण केलं. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश देखील जनतेला वाचून दाखवला.

सुनिता केजरीवाल म्हणाल्या. “केजरीवालस हे सच्चे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. ईडीने त्यांना तुरुंगात टाकलं आहे. पण, खूप काळ ते त्यांना तुरुंगात ठेवू शकणार नाहीत. ज्या हिम्मतीने आणि धैर्याने ते देशासाठी लढत आहेत. स्वातंत्र्यसंग्रामात ज्या पद्धतीने लोकांनी बलिदान दिलं, काम केलं. त्याप्रमाणे अरविंद केजरीवाल देशासाठी काम करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सुनिता केजरीवाल यांनी यावेळी अरविंद केजरीवाल यांचा संदेश सर्वांसमोर वाचून दाखवला.

अरविंद केजरीवाल यांच्या संदेशमध्ये लिहिले होते की, मी आज तुम्हाला मत मागत नाही. एक नवा भारत बनवण्यासाठी मी मदत मागत आहे. १४० कोटी नागरिकांना नवा भारत करण्यासाठी मी निमंत्रण देत आहे. भारत हा गौरवशाली देश आहे. हजारो वर्षांचा याला इतिहास आहे. तरी आपल्या देशातील लोक गरीब का आहेत? असं त्या म्हणाल्या. मी सध्या तुरुंगात आहे. मला येथे विचार करायला खूप वेळ मिळतो. भारत मातेबाबत मी विचार करतो.भारत माता दु:खी आहे. लोकांना दोनवेळचे जेवण मिळत नाही, उपचार मिळत नाही, शिक्षण मिळत नाही तेव्हा भारत माता दु:खी होते. काही नेते हायफाय जीवन जगतात अशा लोकांचा भारत माता द्वेष करते, असे त्या भाषणात म्हणाल्या.

एका नव्या भारताचे आपण स्वप्न पाहूया. सर्व लोकांना रोजगार मिळेल. कोणी गरीब राहणार नाही. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. सर्वांना चांगले आणि मोफत उपचार मिळतील. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात २४ तास वीज असेल. गावागावात चांगले रस्ते असतील. विज्ञानामध्ये भारत अग्रेसर असेल. असा देश बनवूया जिथे सर्वजण समान असतील. बंधुभाव असेल अशा देशाची आपल्याला निर्मिती करायची आहे, असं केजरीवालांचा संदेश सुनिता यांनी वाचून दाखवला. त्या पुढे म्हणाल्या की, केजरीवालांनी तुरुंगातून देशाच्या जनतेला सहा गॅरंटी दिल्या आहेत.

केजरीवाल यांनी दिलेल्या सहा गॅरंटी

१.पूर्ण देशात चोवीस तास वीज पुरवठा देण्यात येईल. कुठेही पॉवर कट होणार नाही

२. संपूर्ण देशातील गरीबांचे वीज बील मोफत असेल

३. प्रत्येक गावात चांगली शाळा बनवली जाईल. गरीब-श्रीमंत न पाहता सर्वांना चांगले शिक्षण मिळेल

४. प्रत्येत गावामध्ये ‘मोहल्ला क्लिनिक’ बनवले जाईल. प्रत्येक जिल्ह्यात मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटल बनवले जाईल

५. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या एमएसपीनुसार धान्याला दर दिले जातील

६. दिल्लीच्या लोकांनी ७५ वर्ष अन्याय सहन केला आहे. त्यांनी निवडून दिलेले सरकार पंगू आहे. त्यामुळे दिल्लीच्या लोकांना न्याय मिळवून देणार. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देणार

Web Title: Arvind kejriwal gave 6 guarantees to the people of the country from jail wife sunita india alliance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • political news

संबंधित बातम्या

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
1

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
2

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
3

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
4

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.