Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑपरेशन टायगर’बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना…; बावनकुळे यांचं मोठं विधान

याबाबत उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच माहिती आहे. भाजपचा या विषयाशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे भाजप किंवा आमच्या नेत्यांना यात गोवणे योग्य नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2026 | 01:27 PM
'ऑपरेशन टायगर'बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना...; बावनकुळे यांचं मोठं विधान

'ऑपरेशन टायगर'बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना...; बावनकुळे यांचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

मुंबई : आम्हाला टायगरच माहीत नाही, कुणी आणले हेदेखील माहित नाही, फोडाफोडीशी भाजपचा काहीही संबंध नाही, असा दावा करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिक बोलणं टाळलं. ऑपरेशन टायगरबद्दल मला काहीही माहिती नाही. ऑपरेशन टायगर का आहे?, त्याचे नाव काय? याची काहीही कल्पना नाही.

याबाबत उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच माहिती आहे. भाजपचा या विषयाशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे भाजप किंवा आमच्या नेत्यांना यात गोवणे योग्य नाही. आमच्या नेत्यांबद्दल टीकाटिप्पणी करणे योग्य नाही, असे बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा आणि एकनाथ शिंदे यांनी पक्ष वाढवावा, याबद्दल कुणाचीही ना नाही. आमदार, खासदार का सोडून चालले याचे ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला देऊन बावनकुळे यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) फोडाफोडीशी भाजपचा कुठलाही संबंध नाही, असा दावा केला.

Shiv Sena Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित; 6 बंडखोरांनी फिरवली पाठ

टंचाईचे नियोजन, पेयजलासाठी राखीव

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने राज्याच्या पाणी स्थितीचा आढावा घेतला. आता जास्तीत जास्त पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा नको

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हा शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सक्षम आणि लोकप्रिय नेते आहे. ते दिल्लीत राहतील की मुंबईत हे माझ्या हातात नाही. राज्याच्या सर्वंकश विकासासाठी त्यांना मुख्यमंत्री केले आहे. फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याची जोरदार प्रगती सुरू आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा करणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले.

आता आमदारांना केले जाणार लक्ष्य?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातून सहा खासदारांनी बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करणे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्याला मान्यता देणे, या घडामोडींनंतर आता राजकीय लक्ष आमदारांकडे वळले आहे.

Web Title: We have no information about operation tiger says chandrashekhar bawankule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Maharashtra Politics
  • Operation Tiger
  • political news

संबंधित बातम्या

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार
1

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका
2

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
3

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

OYO Room Booking : आता OYO मध्ये जात असाल तर सावधान! हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर; बावनकुळेंनी दिले संकेत
4

OYO Room Booking : आता OYO मध्ये जात असाल तर सावधान! हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर; बावनकुळेंनी दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.