Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Voting: कैदेतून आलेल्या नगरसेविकेनेही बजावला मतदानाचा हक्क! सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान, २२ जूनला निकाल

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी ६ केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. भाजप नगरसेविका शालन शिंदे यांनी जेलमधून येत मतदान केले. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 18, 2026 | 02:21 PM
कैदेतून आलेल्या नगरसेविकेनेही बजावला मतदानाचा हक्क!

कैदेतून आलेल्या नगरसेविकेनेही बजावला मतदानाचा हक्क!

Follow Us
Follow Us:
  • कैदेतून आलेल्या नगरसेविकेनेही बजावला मतदानाचा हक्क!
  • सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान
  • २२ जूनला निकाल
सोलापूर, शहर प्रतिनिधी: सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी गुरुवारी जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे ५० टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान, एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या भाजपच्या नगरसेविका शालन शिंदे यांनी पोलीस बंदोबस्तात जेलमधून येत मतदानाचा हक्क बजावल्याने या निवडणुकीची विशेष चर्चा रंगली.

बार्शी, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर येथील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली. सर्व केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी कमांडो पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा नियोजन समितीत उभारलेल्या नियंत्रण कक्षातून सर्व मतदान केंद्रांचे थेट चित्रिकरण पाहत निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले. तसेच आवश्यक सूचना मतदान केंद्राध्यक्षांना दिल्या.

निवडणुकीत भाजपकडे मतदारसंख्या अधिक असल्याने विजयाचा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपची बाजू मजबूत असल्याचे सांगितले. तर खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आमच्या मतदारांची अदृश्य शक्ती निर्णायक ठरेल, असा दावा केला. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदान केंद्रांवर भाजप मतदारांची एकजूटमतदानासाठी भाजपचे सदस्य चार-पाच जणांच्या गटाने मतदान केंद्रांवर येताना दिसत होते. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. दक्षिण सोलापूरमध्येही भाजप कार्यकर्त्यांची एकजूट पाहायला मिळाली.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; मतदारांच्या ‘पहिल्या पसंती’वर साऱ्यांच्या नजरा

विरोधक आणि सत्ताधारी एकाच बाकावर!

उत्तर सोलापूर मतदान केंद्रावर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष महेश गादेकर हे एकाच ठिकाणी बसून गप्पा मारताना दिसले. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय सौहार्दाचे हे चित्र लक्षवेधी ठरले.

दुपारी १२ वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी

कुर्डूवाडी ८० टक्के
उत्तर सोलापूर ७३ टक्के
अकलूज ४७ टक्के
मंगळवेढा ३७ टक्के
पंढरपूर ३० टक्के
दक्षिण सोलापूर ५ टक्के

२२ जून रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे. सहा टेबलांवर दोन फेऱ्यांत मतमोजणी केली जाणार असून निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मतदानासाठी सहा केंद्रांवर व्यवस्था

सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज येथे मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे एकूण ६०० हून अधिक मतदार या निवडणुकीत मतदानासाठी पात्र होते. मतदारांना देण्यात आलेल्या मतपत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंतनाना देशमुख यांचे नाव प्रथम क्रमांकावर, तर भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज घेतले जाणार मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Web Title: Solapur mlc election voting concludes bjp corporator shalan shinde casts vote from jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • MLC Election
  • political news
  • Solapur
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
2

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली
3

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान
4

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.