Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adhir Ranjan Accident : पश्चिम बंगालच्या राजकारणाला सुडाची लागण? प्रचारानंतर अधीर रंजन चौधरींच्या गाडीला ट्रकची धडक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बहारामपूरचे उमेदवार अधीर रंजन चौधरी प्रचार दौऱ्यावरून परतत असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या ताफ्याला धडक दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 09, 2026 | 01:01 PM
Baharampur candidate Adhir Ranjan Chowdhury accident; truck rams during election campaign

Baharampur candidate Adhir Ranjan Chowdhury accident; truck rams during election campaign

Follow Us
Follow Us:

Adhir Ranjan Chowdhury Accident : कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जोरदार प्रचार आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला आहे. मात्र आता या राजकीय विरोधी भूमिका भयान रुप घेत असल्याचा दावा केला जात आहे. बुधवारी रात्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बहारामपूरचे उमेदवार अधीर रंजन चौधरी प्रचार दौऱ्यावरून परतत असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या ताफ्याला धडक दिली. हा अपघात होता की घातपात असा संशय व्यक्त होतो आहे.

 

बहारामपूरचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांचा केवळ एक रस्ते अपघात होता की निवडणुकीच्या अगदी आधी रचलेल्या एखाद्या मोठ्या कटाचा भाग होता, या प्रश्नाने आता पश्चिम बंगाल राज्यात राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. या अपघातात ताफ्यामध्ये असणारे अनेक पोलीस देखील जखमी झाले. बुधवारी (दि.08 एप्रिल) रात्री सुमारे ९ वाजता ही घटना घडली, जेव्हा अधीर रंजन चौधरी कांडी येथील एक जनसंपर्क मोहीम पूर्ण करून बहारामपूरला परत येत होते.

हे देखील वाचा: खाली ट्रेन, वर बुलेट ट्रेन! रेल्वे ट्रॅकवर लाँच झाला १३६० टनाचा सर्वात जड गर्डर; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केल Video

राज्य महामार्ग ११ वरील जिबंती आणि हातपारा दरम्यान हा अपघात झाला. रात्रीच्या वेळी असणारी शांतता वाहनांच्या धडकेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने भंग पावली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या ताफ्यातील संरक्षक वाहनाला धडक दिली, ज्यामध्ये पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा कर्मचारी होते. धडक इतकी जोरदार होती की, सोबत असलेल्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि अनेक सुरक्षा कर्मचारी रक्तबंबाळ झाले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा अपघात आणखी भीषण होऊ शकला असता, पण अधीर रंजनच्या वाहनाच्या चालकाने ऐनवेळी इमर्जन्सी ब्रेक लावून त्यांना सुखरूप वाचवले.

सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी

प्रचारनंतर झालेल्या या अपघातानंतर अधीर रंजन चौधरी या अपघातातून थोडक्यात बचावले, परंतु त्यांचे मीडिया सेलचे अध्यक्ष केतन जयस्वाल यांच्यासह अनेक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती पाहता, केतन जयस्वाल यांना तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेने केवळ समर्थकांच्या भावनांनाच धक्का दिला नाही, तर राजकीय आरोपांची लाटही निर्माण केली आहे. यामागे काही कट असू शकतो का, असे जेव्हा स्वतः अधीर रंजन चौधरी यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सावधपणे “कदाचित” असे उत्तर दिले. काँग्रेस पक्षाने तर याला पूर्वनियोजित हल्ला म्हटले आहे, ज्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.

हे देखील वाचा: निवडणूक आयोगाचा मतता दीदींना दणका; तृणमूल कॉंग्रेसला दिला अंतिम इशारा

पोलिसांकडून तपास सुरू, ट्रक जप्त
घटनेचे गांभीर्य ओळखून, कांडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पीडिताला धडक देणारा ट्रक जप्त केला. हा खरंच अनियंत्रित वाहनाचा अपघात होता की ताफ्याला लक्ष्य करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होता, याचा तपास पोलीस आता करत आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगानेही या प्रकरणात आपले प्रयत्न तीव्र केले असून, जिल्हा पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. पश्चिम बंगालसारख्या राज्यात, जिथे निवडणुकीच्या काळात सुरक्षा हा एक संवेदनशील मुद्दा असतो, तिथे एका प्रमुख नेत्याच्या ताफ्यावर झालेला असा हल्ला प्रशासनासमोर एक मोठे आव्हान निर्माण केले आहे. अशाच राजकीय नेत्यांवर प्रचारावेळी केलेल्या हल्ल्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. यामुळे नेत्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Baharampur candidate adhir ranjan chowdhury accident truck rams during election campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Adhir ranjan
  • political news
  • West bengal
  • west bengal election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
1

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Congress leader Sajjan Kumar Passes Away: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे निधन; सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2

Congress leader Sajjan Kumar Passes Away: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे निधन; सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार
3

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार

नितीन नबीन यांच्या टीममध्ये पियूष गोयल; आता केंद्रीय मंत्रिपदाचा द्यावा लागणार राजीनामा?
4

नितीन नबीन यांच्या टीममध्ये पियूष गोयल; आता केंद्रीय मंत्रिपदाचा द्यावा लागणार राजीनामा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.