Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Ambedkar : राज्य सरकारकडे पुढच्या तीन महिन्यांएवढाही धान्यसाठा नाही? प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, म्हणाले…

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.दुष्काळात महायुतीच्या सर्व मित्रपक्षांनी खेळखंडोबा केल्याचा गंभीर आरोप केला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 21, 2026 | 04:44 PM
Prakash Ambedkar press conference in Nagpur targets the Mahayuti government nrpm

Prakash Ambedkar press conference in Nagpur targets the Mahayuti government nrpm

Follow Us
Follow Us:
  • वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद 
  • नागपूरमधून साधला महायुती सरकारवर निशाणा
  • कापसावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी 
Prakash Ambedkar Political News : नागपूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून, शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देऊन त्यांची थट्टा केली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. शासनाने कापसाला जाहीर केलेला हमीभाव प्रत्यक्षात मिळण्यासाठी भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “दुष्काळात महायुतीच्या सर्व मित्रपक्षांनी खेळखंडोबा केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देऊन त्यांची थट्टा केली आहे. आम्ही कोणालाही मदत करू नये, अशी सरकारची मूलभूत भूमिका आहे,” असा आरोप त्यांनी केला.

विदर्भ आणि मराठवाडा हे देशातील कापूस उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून, देशातील ६३ टक्के कापूस या दोन्ही भागांतून येतो. ब्राझीलमध्ये यंदा कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. तेथील प्रक्रिया क्षमतेपेक्षा उत्पादन अधिक असल्याने जागतिक बाजारपेठेत कापूस विकण्यासाठी पर्याय शोधण्याची वेळ ब्राझीलवर आली आहे. अशा परिस्थितीत आयात होणाऱ्या कापसावर शुल्क वाढविण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Nitesh Rane Press Confernce : टिपू सुलतान जयंतीवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही…’

३१ ऑक्टोबरपर्यंत आयात होणाऱ्या कापसावर आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. मात्र, कापसाला सरकारने हमीभाव जाहीर करूनही सीसीआयने अद्याप हमीभावाने खरेदी सुरू केलेली नाही. आयात होणाऱ्या कापसावर २० टक्के आयात शुल्क लावावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. “३१ डिसेंबरपर्यंत आयात शुल्क १७ टक्के होते. त्यात तीन टक्क्यांनी वाढ करून ते २० टक्के करावे, अशी आमची मागणी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त परिस्थितीत शासनाला शेतकऱ्यांना थेट मदत करता येत नसेल, तर बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करावी. कापड प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून तयार कपड्यांच्या विक्रीवरही नियंत्रण आणले पाहिजे. त्यामुळे बाजारातील दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल, असे आंबेडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही सरकारला आव्हान देतो की, यावेळी लक्ष्यकेंद्रित आंदोलन केले जाईल. या आंदोलनाची सुरुवात नागपूरमधून करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

Pakistan Minister India Visit : पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मसूद मलिक भारत दौऱ्यावर; ताजमहल पाहण्याची दिली परवानगी पण…

भाजप आणि आरएसएसचे सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार असल्याची टीका करताना, राज्य सरकारकडे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुरेल इतका अन्नधान्याचा साठा नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात अन्नधान्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असून, व्यापाऱ्यांकडे मात्र मालाचा साठा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, इंदू मिलच्या संदर्भातील प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करणे टाळले आहे.

Web Title: Prakash ambedkar press conference in nagpur targets the mahayuti government nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • daily news
  • political news
  • VBA Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

Nitesh Rane Press Confernce : टिपू सुलतान जयंतीवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही…’
1

Nitesh Rane Press Confernce : टिपू सुलतान जयंतीवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही…’

दोन दिवसांत भाजपला दुसरा धक्का; बड्या महिला नेत्याने दिला राजीनामा, काँग्रेसमध्ये जाणार
2

दोन दिवसांत भाजपला दुसरा धक्का; बड्या महिला नेत्याने दिला राजीनामा, काँग्रेसमध्ये जाणार

Yogi Adityanath Mother passed Away : मुख्यमंत्री योगी त्यांच्या वडिलोपार्जित पंचूर गावी दाखल; आईच्या पार्थिवाचे घेतले अखेरचे दर्शन
3

Yogi Adityanath Mother passed Away : मुख्यमंत्री योगी त्यांच्या वडिलोपार्जित पंचूर गावी दाखल; आईच्या पार्थिवाचे घेतले अखेरचे दर्शन

PCMC Approved corporators : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर; तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर घोषणा
4

PCMC Approved corporators : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर; तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.