Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Gandhi as PM : प्रियांका गांधींना पंतप्रधान करा..! राहुल गांधींना डावलून कॉंग्रेस नेते का करतायेत मागणी?

बांगलादेशमध्ये सध्या अराजकता सुरु असून हिंदूंवर प्रचंड अत्याचार सुरु आहेत. या प्रकरणावरुन प्रियांका गांधी यांना भारताच्या पंतप्रधान करा अशी मागणी कॉंग्रेसमधून केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 23, 2025 | 03:28 PM
Bangladesh violence against Hind demand to make Priyanka Gandhi as Prime Minister of India

Bangladesh violence against Hind demand to make Priyanka Gandhi as Prime Minister of India

Follow Us
Follow Us:

Priyanka Gandhi as PM : नवी दिल्ली : सध्या बांगलादेशमध्ये अराजकता माजली असून हिंसाचार अन् अत्याचार उफाळला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंना टार्गेट केले जात आहे. हिंदूंना भररस्त्यामध्ये मारहाण केली जात असून जीवंत जाळले जात आहे. या अमानवी हिंसाचाराविरोधात भारतातून आता आवाज उठवला जात आहे. मात्र बांगलादेशमधील हिंदूंसाठी सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बांगलादेशमधील या परिस्थितीवर भाष्य करताना प्रियांका गांधी यांना पंतप्रधान करा अशी मागणी केली जात आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशवेळी घेतलेल्या निर्णयाच्या बळावर अशी मागणी केली जात आहे.

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी प्रियंका गांधी यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी केली आहे. जर त्यांना पंतप्रधान बनवले गेले तर त्या इंदिरा गांधींप्रमाणेच देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी जोरदार प्रयत्न करतील, असे त्यांनी म्हटले आहे. मसूद यांनी असेही म्हटले आहे की प्रियंका गांधी यांच्या नावात “गांधी” आहे. आणि त्या धडाकेबाज दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नात आहेत. अशा इंदिरा गांधी ज्यांनी पाकिस्तानला इतके नुकसान केले की जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी घेतला आहे.

हे देखील वाचा : दोन दशकानंतर महाराष्ट्राचे स्वप्न अखेर पूर्ण होणार! उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा

प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करा

प्रियंका गांधी गाझावर बोलतात, पण बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबद्दल एकही शब्द बोलल्या नाहीत, अशा शब्दांत भाजपकडून टीका करण्यात आली. भाजपच्या या आरोपांवर इम्रान मसूद यांनी उत्तर दिले आहे. मसूद म्हणाले की, “प्रियांका गांधी काय आता पंतप्रधान आहेत का? प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करा आणि इंदिरा गांधींनी पाकिस्तानला दिलेल्या प्रतिसादाप्रमाणे त्या काय उत्तर देतील ते पहा. पण तुमच्यामध्ये असं करण्याची हिम्मत सुद्धा नाही” असा इशारा कॉंग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी भाजपला दिला आहे.

बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचाराची दखल घेण्याचे आवाहन काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी भारत सरकारला केले आहे. बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या क्रूर मॉब लिंचिंगनंतर हे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी लिहिले की, “बांगलादेशमध्ये हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या क्रूर मॉब लिंचिंगची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजात धर्म, जात, ओळख इत्यादींवर आधारित भेदभाव, हिंसाचार आणि हत्या हे मानवतेविरुद्धचे गुन्हे आहेत. भारत सरकारने शेजारील देशात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचाराची दखल घ्यावी आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा बांगलादेश सरकारसमोर जोरदारपणे उपस्थित करावा.” असे स्पष्ट मत कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Bangladesh violence against hind demand to make priyanka gandhi as prime minister of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Bangladesh violence
  • Congress
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
1

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण
2

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
3

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
4

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.