Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal on BJP Over Vande Mataram Controversy : मुंबईत उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते, तर सपकाळ यांनी नव्या कार्यकर्त्यांच

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 15, 2026 | 08:30 PM
Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Photo Credit- X)

Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये
  • भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा
  • उत्तर भारतीय बिहारी फ्रँटचा काँग्रेस पक्षात प्रवेश
मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रँटचे नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन मधील एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजेंद्र पाल गौतम, उदित राज, प्रदेश सरचिटणीस राणी अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

महाडीबीटीचा विस्तार! २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना; फडणवीसांची मोठी घोषणा

“उत्तर भारतीय समाज मुंबईसह राज्याच्या प्रत्येक भागात रहात असून महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचेही योगदान आहे. हा समाज काँग्रेस पक्षासोबत नेहमी खंबीरपणे उभा राहिला व काँग्रेस पक्षानेही उत्तर भारतीयांना मुंबई व महाराष्ट्रात विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. राहुल गांधी यांच्या रुपाने काँग्रेस पक्षाला एक कणखर नेतृत्व लाभले असून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे. काँग्रेस संघटना मजबूत करून देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करा”, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

वंदे मातरम वरून राजकारण करण्याचा भाजपाचा प्रयत्न..

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वंदे मातरम राष्ट्रगितावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे. वंदे मातरम हे १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात पहिल्यांदा गायले गेले व तर २४ जानेवारी १९५० रोजी ते देशाचे राष्ट्रीयगीत म्हणून स्वीकारण्यात आले. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या उपस्थितीत याचा निर्णय झालेला असून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात व कार्यक्रमात ते गायिले जाते. भारतीय जनता पक्षाकडून एक व्हिडिओ प्रसारित करून काँग्रेसविरोधात अपप्रचार केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना जास्त वेळ उभा राहता येत नाही ये लक्षात घेऊन सोनियाजी गांधी काही सुचना करत आहेत परंतु भाजपा कडून मात्र वंदे मातरमचा अपमान केल्याचा अपप्रचार केला जात आहे, हा अपप्रचार थांबवावा.वंदे मातरम बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवण्याची गरज नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजेंद्र पाल गौतम यावेळी म्हणाले की, देशात पूर्वी सर्वसामान्य लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत मतदानाचा हक्क सर्वांना देण्याचा मुद्दा मांडला व १९३५ साली कायदा बनला, त्यानुसार सर्वसामान्य समाजातील घटकांना तसेच महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळाला आणि १९३७ साली झालेल्या निवडणुकीत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्यांना आपल्या पूर्वजांचा इतिहास माहित नाही ते इतिहास घडवू शकत नाहीत म्हणून स्वातंत्र्याची लढाई कोणाच्या नेतृत्वाखाली लढली हे माहित असले पाहिजे. काही लोकांना वाटते स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले त्यांना हे माहित हवे की स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढली गेली, या लढाईत हजारो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, जेलमध्ये गेले, लाठ्या काठ्या अंगावर घेतल्या. देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारत गरिब देश होता पण काँग्रेसच्या सरकारांनी विकासाची एक एक शिखरे उभी केली पण आजचे सरकार ते सर्व विकत आहे. आज जे लोक सत्तेत आहेत त्यांनी समाजात जाती धर्माच्या नावावर विष पेरले आहे. समाजात विष पेरणाऱ्यांना आता सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.

यावेळी उदित राज म्हणाले की, मुंबईतसह महाराष्ट्रात उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणात आहे. उत्तर भारतीयांना काँग्रेसने नेतृत्व करण्याची संधी दिली, मंत्री, आमदार व खासदार बनवले. काँग्रेसला तुमची व तुम्हाला काँग्रेसती गरज आहे. देशात धर्मनिरपेक्ष पक्ष हा फक्त काँग्रेस पक्ष आहे आणि सरकारला जाब विचारणारा नेता फक्त राहुल गांधी हे आहेत. आता भाजापच्या सत्तेचे काऊंटडाऊंन सुरु झाले असून काँग्रेसचे सरकार लवकरच देशात येणार आहे असा विश्वास उदित राज यांनी व्यक्त केला.

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

Web Title: Harshvardhan sapkal bjp vande mataram controversy maharashtra congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshwardhan Sapkal
  • vande mataram

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.