मे महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यानंतर जून महिना सुरु होईल. जून महिन्यात बँका 10 दिवस बंद राहणार आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांची यादी जाहीर केली. यात शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्टीचाही समावेश आहे. जून महिन्यात एकूण 5 रविवार येतात. अशा परिस्थितीत या दिवशी कामकाज बंद राहणार आहे. बँकेत जाण्यापूर्वी तुम्ही या सुट्ट्यांची यादी नक्कीच तपासा…
जूनमध्ये आठवड्यातील प्रत्येक रविवार आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्ट्या आणि इतर अनेक सुट्ट्या असतात. जूनमध्ये एकूण 10 दिवस बँकांना सुट्ट्या असतील.
जूनची पहिली सुट्टी: 2 जून रोजी असेल. रविवारमुळे बँका बंद आहेत. त्यानंतर 17 जून रोजी बकरी ईदमुळे जवळपास संपूर्ण देशात बँका बंद राहतील. इतर काही ठिकाणी 18 जून रोजी साजरी ईदसाठी बकऱ्याचा बळी दिला जाणार आहे. जम्मू आणि श्रीनगरमध्ये बकरीदची सुट्टी दोन दिवस असते. अशा स्थितीत 18 जून लाही बँकांमध्ये कामकाज होणार नाही.
या दिवशी बॅंका बंद असणार
2 जून 2024 – रविवार, साप्ताहिक सुट्टी
8 जून 2024 – दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद.
9 जून 2024 – रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी
15 जून 2024- वायएमए डे किंवा राजा संक्रांतीमुळे भुवनेश्वर, आयझॉल झोनमध्ये बँका बंद.
16 जून 2024 – रविवार असल्यामुळे बँका बंद
17 जून 2024 – बकरी ईदमुळे जवळपास संपूर्ण देशात बँका बंद.
18 जून 2024 – जम्मू आणि श्रीनगर झोनमध्ये बकरी ईदमुळे बँका बंद राहिल्या.
22 जून 2024 – चौथा शनिवार
23 जून 2024 – रविवार असल्यामुळे बॅंकांना साप्ताहिक सुट्टी
30 जून 2024 – रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी
दरम्यान, ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमसारख्या सुविधा सुट्टीच्या दिवशीच सुरू होतील. तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही तुमचे काम पूर्ण करु शकता. बँक बंद असताना सर्व ऑनलाइन सुविधा सुरू राहतील.






