'डीएसपी करंडक मान्सून लीग' (फोटो- सोशल मीडिया)
आव्हाळवाडी येथील राजगड स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर पार पडलेल्या या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्टॅलियंस संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १६५ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. रोहित गायकवाडने ४८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याला ऋतुराज गायकवाड (२४), पवन आनंद (२३), नाबाद विक्रांत दुबे (२०), ओमकार मेटे (१५) आणि अभिजीत तिवारी (१०) यांनी उपयुक्त साथ देत संघाचा डाव सावरला. वामोस क्रिकेट क्लबकडून गोलंदाजीत वामसी वामोसने ३ गडी बाद करत २६ धावा दिल्या, तर जगत खमारने १५ धावांत २ बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वामोस क्रिकेट क्लबला २० षटकांत ९ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर हितेश शर्माने ४६ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा फटकावून एकाकी झुंज दिली. तसेच मुकेश वासवानी (२९), वामसी वामोस (१५) आणि अनुज राय (१२) यांनी विजयासाठी प्रयत्न केले; मात्र स्टॅलियंसच्या भेदक माऱ्यासमोर ही लढत अपुरी ठरली. स्टॅलियंसकडून गोलंदाजीत पवन आनंदने २३ धावांत ४ महत्त्वाचे गडी बाद करत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. त्याला मयूर मिस्त्री (२-२५) आणि विजयकुमार अय्यर (१-१९) यांनी अचूक मारा करत चांगली साथ दिली.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
अष्टपैलू कामगिरीसाठी पवन आनंदला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना भव्य करंडक देऊन गौरविण्यात आले. हे पारितोषिक वितरण योगेश सातव यांच्या हस्ते पार पडले.
: स्टॅलियंस: २० षटकांत ७ बाद १६५ धावा
(रोहित गायकवाड ५९ (४८ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार), ऋतुराज गायकवाड २४, पवन आनंद २३, नाबाद विक्रांत दुबे २०, ओमकार मेटे १५, अभिजीत तिवारी १०; वामसी वामोस ३-२६, जगत खमार २-१५)
वि. वि.
: वामोस क्रिकेट क्लब: २० षटकांत ९ बाद १५७ धावा
(हितेश शर्मा ५८ (४६ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), मुकेश वासवानी २९, वामसी वामोस १५, अनुज राय १२; पवन आनंद ४-२३, मयूर मिस्त्री २-२५, विजयकुमार अय्यर १-१९)






