Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्फोसिसला मोठा झटका; 12500 कोटींचा मोडला करार, आता…

वर्ष संपता संपता देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनीला मोठा धक्का बसला आहे. सप्टेंबरमध्ये इन्फोसिसनं एका जागतिक स्तरावरील कंपनीसोबत केलेला मोठा करार मोडला आहे. हा करार 1.5 अब्ज डॉलर म्हणजेच 12500 कोटी रुपयांचा होता. याबद्दलची माहिती इन्फोसिसकडून देण्यात आलेली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 25, 2023 | 09:40 PM
infosys

infosys

Follow Us
Follow Us:

मुंबई : वर्ष संपता संपता देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनीला मोठा धक्का बसला आहे. सप्टेंबरमध्ये इन्फोसिसनं एका जागतिक स्तरावरील कंपनीसोबत केलेला मोठा करार मोडला आहे. हा करार 1.5 अब्ज डॉलर म्हणजेच 12500 कोटी रुपयांचा होता. याबद्दलची माहिती इन्फोसिसकडून देण्यात आलेली आहे. इन्फोसिसने 23 डिसेंबरला जागतिक कंपनीसोबतचा करार संपुष्टात आल्याची माहिती दिली.

कृत्रिमबुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित असलेला करार मोडण्यात आल्याचा फटका इन्फोसिसला बसू शकतो. कंपनीनं इन्फोसिससोबतचा सामंजस्य करार संपुष्टात आणला आहे. हा करार 15 वर्षांचा होता. सप्टेंबर 2023 मध्ये करार करण्यात आला होता. इन्फोसिस आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जागतिक कंपनीला डिजिटल एक्सपीरियन्स आणि एआय सोल्युशन्स पुरवणार होती. या करारामुळे इन्फोसिससाठी गेला सप्टेंबर महिना कॉन्ट्रक्ट व्हॅल्यूच्या दृष्टीनं उत्तम गेला. पण अवघ्या तीन महिन्यांतच या कराराला ब्रेक लागला आहे. इन्फोसिसने याबद्दलची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे.

जागतिक कंपनीनं आमच्यासोबतचा सामंजस्य करार संपुष्टात आणला आहे, असे इन्फोसिसकडून सांगण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांतला हा कंपनीसाठीचा दुसरा झटका आहे. कंपनीचे माजी सीएफओ नीलांजन रॉय यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे कंपनीला मोठा धक्का बसला. आता 12500 कोटींचा करार रद्द झाला आहे.

नारायण मूर्ती सहसंस्थापक असलेल्या इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 6,212 कोटींची कमाई केली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीची तुलना करता नफ्यात 3 टक्क्यांची वाढ झाली.

Web Title: Big blow to infosys 12500 crore broken deal nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2023 | 09:40 PM

Topics:  

  • Lay Off
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
1

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
2

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
3

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार
4

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.