Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार

अकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकोट रोड परिसरात मालमत्तेच्या वादातून वडील आणि मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात शेख युनूस आणि त्यांचा मुलगा समीर शेख युनूस हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2026 | 12:10 PM
मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार

Follow Us
Follow Us:
  • मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला
  • दोघे गंभीर जखमी
  • नगरसेवकासह साथीदार पसार
अकोला : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता अकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकोट रोड परिसरात मालमत्तेच्या वादातून वडील आणि मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात शेख युनूस आणि त्यांचा मुलगा समीर शेख युनूस हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात एका नगरसेवकासह त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

अकोट रोड परिसरात मालमत्तेच्या वादातून शेख युनूस आणि त्यांचा मुलगा समीर यांचा संबंधित नगरसेवकासोबत वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. यावेळी नगरसेवकासह त्याच्या साथीदारांनी दोघांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी पाईपने मारहाण करण्यासोबतच चाकूने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वडील-मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर नगरसेवकासह त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मालमत्तेच्या वादाची पार्श्वभूमी आणि घटनेमागील नेमके कारण यांचा तपास केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : नाशिकच्या द्वारका परिसरात रक्तरंजित थरार! ३८ वर्षीय वाहनचालकाची दगडाने ठेचून हत्या

सावत्र नातवाने केली आजीची हत्या

प्रॉपर्टीमध्ये हिस्सा देत नसल्याच्या रागातून सावत्र नातवाने आपल्या ६५ वर्षीय सावत्र आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपळे गुरव येथे घडली आहे. ओंकार किसन शिंगोरे (वय २६) असे आरोपीचे नाव असून, मंगल बाबुराव शिंगोरे (वय ६५) असे मृत आजीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ९) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पिंपळे गुरव येथील कृष्णा चौकात गणेश सहकारी बँकेच्या शेजारील इमारतीत शिंगोरे कुटुंबीय राहत होते. प्रॉपर्टीतील हिस्सा देण्याच्या मुद्द्यावरून आरोपी आणि त्याच्या सावत्र आजीमध्ये वाद होता. याच कारणातून आरोपीने आजीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: A shocking incident involving a life threatening attack on a father and son has occurred nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
1

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

नाशिकच्या द्वारका परिसरात रक्तरंजित थरार! ३८ वर्षीय वाहनचालकाची दगडाने ठेचून हत्या
2

नाशिकच्या द्वारका परिसरात रक्तरंजित थरार! ३८ वर्षीय वाहनचालकाची दगडाने ठेचून हत्या

Ulhasnagar News : कैलास कॉलनी फायरिंग तपासात ‘खाकी कनेक्शन’; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित
3

Ulhasnagar News : कैलास कॉलनी फायरिंग तपासात ‘खाकी कनेक्शन’; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.