Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! न्यायमूर्ती सूर्यकांत असतील भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; जाणून घ्या कधी स्वीकारणार पदभार

न्यायमूर्ती सूर्यकांत हे विद्यमान सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या जागी पदभार स्वीकारतील, ज्यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे. केंद्रीय कायदा मंत्री अरुण राम मेघवाल यांनी या नियुक्तीची माहिती सोशल मीडियावर दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 30, 2025 | 10:01 PM
मोठी बातमी! न्यायमूर्ती सूर्यकांत असतील भारताचे ५३ वे सरन्यायाधीश

मोठी बातमी! न्यायमूर्ती सूर्यकांत असतील भारताचे ५३ वे सरन्यायाधीश

Follow Us
Close
Follow Us:
  • न्यायमूर्ती सूर्यकांत असतील भारताचे ५३ वे सरन्यायाधीश
  • २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पदभार स्वीकारणार
  • तब्बल १५ महिने सांभाळणार जबाबदारी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने गुरुवारी न्यायमूर्ती सूर्यकांत (Justice Surya Kant) यांची भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India – CJI) म्हणून नियुक्ती केली आहे. कायदा मंत्रालयाच्या न्याय विभागाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली. न्यायमूर्ती सूर्यकांत हे विद्यमान सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या जागी पदभार स्वीकारतील, ज्यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे. केंद्रीय कायदा मंत्री अरुण राम मेघवाल यांनी या नियुक्तीची माहिती सोशल मीडियावर दिली. “भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची २४ नोव्हेंबर २०२५ पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो.”

In exercise of the powers conferred by the Constitution of India, the President is pleased to appoint Shri Justice Surya Kant, Judge of the Supreme Court of India as the Chief Justice of India with effect from 24th November, 2025. I convey my heartiest congratulations and best… pic.twitter.com/3X0XFd1Uc9 — Arjun Ram Meghwal (@arjunrammeghwal) October 30, 2025

१५ महिन्यांचा असणार कार्यकाळ

विद्यमान सरन्यायाधीश बीआर गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होतील. त्यानंतर, न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते सुमारे १५ महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम करतील. ते वयाच्या ६५ व्या वर्षी ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होतील.

Next CJI of Supreme Court: न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे पुढचे CJI; हरियाणातील गाव ते SC पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

न्यायमूर्ती सूर्यकांत: सामान्य कुटुंबातून आलेले न्यायाधीश

न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. सामान्य परिस्थितीतून त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील पेटवार या लहानशा गावात एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अत्यंत साधे होते. त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण अशा सरकारी शाळेत घेतले, जिथे बेंचही नव्हते आणि मुले जमिनीवर बसून शिक्षण घेत होती. त्यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली, त्यानंतर १९८४ मध्ये रोहतक येथील महर्षि दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) पूर्ण केली.

विक्रमी ॲडव्होकेट जनरल ते सर्वोच्च न्यायालय

१९८४ मध्ये त्यांनी हिसार येथील जिल्हा न्यायालयात वकिलीच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि १९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी चंदीगडला गेले. ७ जुलै २००० रोजी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी ते हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल बनले, जो राज्याच्या कायदेशीर इतिहासातील एक विक्रम आहे. एका वर्षानंतर, मार्च २००१ मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले.

न्यायाधीश प्रवास

९ जानेवारी २००४ रोजी त्यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ऑक्टोबर २०१८ मध्ये ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली.

‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी

Web Title: Big news justice suryakant will be the 53rd chief justice of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 10:01 PM

Topics:  

  • Central Governement
  • Chief Justice of India
  • CJI BR Gavai
  • Supreme Court

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी दिलासा! सोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी ३० ऑक्टोबरपासून सुरू; कापसाच्या एमएसपीमध्ये मोठी वाढ
1

शेतकऱ्यांसाठी दिलासा! सोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी ३० ऑक्टोबरपासून सुरू; कापसाच्या एमएसपीमध्ये मोठी वाढ

‘फार्मर आयडी’ मिळत नसल्याने शेतकरी संतप्त! तलाठी, तहसील कार्यालयात उडवाउडवीची उत्तरे, दलालांकडून आर्थिक पिळवणूक
2

‘फार्मर आयडी’ मिळत नसल्याने शेतकरी संतप्त! तलाठी, तहसील कार्यालयात उडवाउडवीची उत्तरे, दलालांकडून आर्थिक पिळवणूक

Ola, Uber ला मोठी टक्कर! केंद्र सरकारकडून ‘Bharat Taxi’ सेवा लॉन्च; किती असणार भाडे? जाणून घ्या सविस्तर
3

Ola, Uber ला मोठी टक्कर! केंद्र सरकारकडून ‘Bharat Taxi’ सेवा लॉन्च; किती असणार भाडे? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.