Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Assembly Election 2025: NDA चा विजय झाल्यास कोण होणार बिहारचा मु्ख्यमंत्री? अमित शाहांच्या विधानाने सस्पेन्स वाढला

आमच्याकडे अजूनही जास्त आमदार आहेत, तरीही नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील. नितीश हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत आणि काँग्रेस पक्षाशी त्यांचा संबंध कधीच जास्त काळ टिकला नाही

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 17, 2025 | 09:52 AM
Bihar Assembly Election 2025: NDA चा विजय झाल्यास कोण होणार बिहारचा मु्ख्यमंत्री?  अमित शाहांच्या विधानाने सस्पेन्स वाढला
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग
  • भाजपच नाही तर संपूर्ण बिहारच्या जनतेचाही नितीश कुमारांवर विश्वास
  • बिहारसाठी भाजपचा महाराष्ट्र फॉर्म्युला
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी महत्त्वाचीच नव्हे तर प्रतिष्ठेचीही मानली जात आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून बिहारच मुख्यमंत्री कोण होणार,याबाबतही चर्चांना जोर आला आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. राजधानी पटना येथील एका मीडिया चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना, एनडीएच्या विजयानंतर विधीमंडळ पक्ष बिहाराच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.

AFG vs BAN : ‘लज्जास्पद’ पराभवानंतर बांगलादेशच्या चाहत्यांचा टीमवर राडा, वाहनांवर केला हल्ला! 

विधिमंडळ पक्ष आपला नेता

मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या प्रश्नावर शहा म्हणाले, बिहारमध्ये सध्या एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवत आहे. केवळ भाजपच नाही तर संपूर्ण बिहारच्या जनतेचाही नितीश कुमारांवर विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणारा मी कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला.तसेच, ही इतक्या पक्षांची युती आहे की निवडणुकीच्या निकालानंतर विधिमंडळ पक्षांची बैठक होईल आणि विधीमंडळ पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा नेता ठरवेल. सध्या, आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत आणि ते आमच्या निवडणूक मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.”

बिहारमधील लोकांचाही त्यांच्यावर विश्वास

जर भाजपने बहुमताने निवडणुका जिंकल्या तर नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला “आमच्याकडे अजूनही जास्त आमदार आहेत, तरीही नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील. नितीश हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत आणि काँग्रेस पक्षाशी त्यांचा संबंध कधीच जास्त काळ टिकला नाही. जेव्हाही ते काँग्रेस पक्षात होते तेव्हा ते अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ राहू शकले नाहीत. एखाद्या नेत्याचे मूल्यांकन करण्यासाठी, त्याच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीकडे पाहिले पाहिजे.

Explainer: अमेरिकेत 18 ऑक्टोबर रोजी आहे ‘No Kings’ प्रोटेस्ट, काय आहे नक्की याचे वैशिष्ट्य

नितीश जन्मापासूनच काँग्रेसचे विरोधक

नीतीश कुमार यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा संदर्भ देताना अमित शाह म्हणाले, “ते समाजवादी विचारसरणीचे आहेत. ते लहानपणापासूनच काँग्रेस पक्षाच्या विरोधात आहेत. त्यांनी जेपी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाविरुद्ध जोरदार लढा दिला.” ते पुढे म्हणाले, ‘मला पूर्ण विश्वास आहे की केवळ भाजपच नाही तर बिहारच्या जनतेचाही नितीश कुमारांवर विश्वास आहे.’

बिहारसाठी भाजपचा महाराष्ट्र फॉर्म्युला ?

अमित शहा यांच्या उत्तराने आपल्याला भाजपच्या महाराष्ट्राच्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. महाराष्ट्रात कमी जागा असूनही, भाजपने शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, महायुती युती जिंकली तर मुख्यमंत्री कोण होईल असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री कोण होईल या प्रश्नाच उत्तर देणे प्रत्येक भाजप नेत्याने वारंवार टाळले होते. महाराष्ट्रातील महायुती युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे आणि मुख्यमंत्रिपदाची जागा निवडणूक निकालानंतर निश्चित केली जाईल, असं अमित शाहांनी प्रत्येकवेळी सांगितलं होते.

Womens ODI World Cup 2025: महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक;

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती युतीने प्रचंड विजय मिळवला. त्यानंतर, भाजपने देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच कोट्यातून मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. मुख्यमंत्रीपदाची जागा सांभाळणारे एकनाथ शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पदाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या गृहमंत्री अमित शहा यांचे नितीश कुमार यांच्या विधानाने बिहारमध्ये महाराष्ट्राचा फॉर्म्युला पुनरावृत्ती होईल, जो नितीश कुमार यांच्यासाठी तणावाचा विषय देखील असू शकतो.

 

Web Title: Bihar assembly election 2025 will nitish kumar become the chief minister of bihar amit shahs statement increases suspense

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 09:52 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.