महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक (Photo Credit- X)
ॲलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन महिला संघाने आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये शानदार प्रदर्शन कायम ठेवले आहे. विशाखापट्टणम येथे बांगलादेश महिला संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीतील (Semi-Final) आपले स्थान निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला ५० षटकांत १९८ धावांपर्यंत रोखले आणि हे आव्हान त्यांनी केवळ २४.५ षटकांत कोणत्याही नुकसानशिवाय पूर्ण केले.
Australia breeze past Bangladesh to seal their semi-final spot at #CWC25 🔥#AUSvBAN 📝: https://t.co/hw1f4HktRX pic.twitter.com/N8x5UAxFJF — ICC (@ICC) October 16, 2025
ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील जागा पक्की केल्यामुळे आता उर्वरित तीन स्थानांसाठीची स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे, ज्यामुळे भारतीय संघाची (Team India) पुढील वाटचाल खडतर झाली आहे. गुणतालिकेत भारतीय महिला संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी २ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत.
IND vs AUS वनडे सामने किती वाजता होणार सुरू? वेळ लगेच करुन घ्या नोट, नाहीतर…
टीम इंडियासाठी या स्पर्धेत आता राहिलेले पुढील तीन सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारताचे सामने इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघांशी होणार आहेत. उपांत्य फेरीत आपले स्थान सहज आणि निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे.
ऑस्ट्रेलिया वगळता उर्वरित तीन जागांसाठी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांची दावेदारी मजबूत दिसत आहे: