Bihar couple names daughter Sindoori after Operation Sindoor
बिहार : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर भारताने देखील 14 दिवसानंतर ऑपरेशन सिंदूर केले. यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. यानंतर बिहारमधील एका याच दिवशी झालेल्या कन्येचे नाव तिच्या पालकांनी ही घटना लक्षात राहिल असे ठेवले आहे. यामुळे परिसरातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचा मुरीदके तळ यांचा समावेश आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन भारताला महत्त्वाच्या देशांचा पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर भारतीयांनी देखील सेनेने केलेल्या या हलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या जीवांचा बदला घेतल्याची भावना व्यक्त केली आहे. देशातील कानाकोपऱ्यामध्ये जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. देशवासियांनी आपल्यापरिने याचा आनंद साजरा केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काल (दि.07) देशभरामध्ये सर्वत्र ऑपरेशन सिंदूरची चर्चा होती. या ऑपरेशनचे समर्पक असे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. सर्वांच्या तोंडी हेच नाव दिसून येत आहे. याच दिवशी बिहारमध्ये एका दाम्पत्याने मुलीला जन्म दिला. त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. भारतीय सेनेने दहशतवादविरोधात केलेल्या धडाकेबाज कारवाईच्या सन्मानार्थ बिहारच्या या दांपत्याने आपल्या मुलीला अनोखं नाव दिलं आहे. त्यांनी आपल्या मुलीचं नाव सिंदूरी असं ठेवलं आहे. अनेकांना यामुळे आश्चर्य वाटले आहे. पण देशासाठी कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. ऑपरेशन सिंदूरमुळे जगाला भारताचे सामर्थ्य दिसून आले आहे. यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे बिहारच्या दाम्पत्याने या कारवाईचा अभिमान बाळगून त्यांच्या मुलीचे ‘सिंदूरी’ हे अविस्मरनीय नावं ठेवलं आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, जिल्ह्यातील कुर्सेला येथील रहिवासी संतोष मंडल आणि राखी कुमारी यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव सिंदूरी ठेवलं. ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांविरोधात कारवाई झाली, त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा जन्म झाला, असं कुटुंबातील सदस्यांचे म्हणणं आहे. आपल्या लेकीने मोठं होऊन सैन्यातील अधिकारी बनून देशसेवा करावी, असे या मुलीच्या पालकांचे स्वप्न आहे.