(फोटो सौजन्य – X)
पहलगाम हल्ल्याच्या उत्तरार्थ भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केलं. याअंतर्गत भारताने ७ मे रोजी पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांना उद्धवस्त करण्यात आले. भारताने आपल्या लेसर मिसाईलने पाकिस्तानच्या फायटर जेटला नष्ट केले. मनोरंजक गोष्ट म्हणजे, हा फायटर जेट चीनने पाकिस्तानला दिला होता. हा हल्ला रात्रीच्या सुमारास झाला. याचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून हा मुद्दा आता चर्चेचा विषय बनला आहे.
पाकिस्तनात झालेल्या या हल्लयाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहेत. यातच आणखीन आता आणखीन एक व्हिडिओ समोर आला जो पाकिस्तानात झालेल्या हल्ल्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये हल्ल्यावेळी लोक इकडे तिकडे पाळताना, आपला जीव वाचवताना दिसून आली. व्हिडिओमध्ये, एक जोरदार हल्ला झाल्याचे दिसते, ज्यामुळे सर्वत्र आगीच्या ज्वाळा पसरू लागतात. हा हल्ला इतका मोठा असतो की यामुळे आजूबाजूचे सर्व लोक जागे होतात आणि आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागतात. हल्ल्यामुळे सगळीकडे गोंधळ मजल्याचे दिसून येते तर काहीजण आपल्या फोनच्या कॅमेरात हे दृश्य कैद करतानाही दिसून येतात. भारताने केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरले असल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तान क़े हालात का सबूत माँगने वाले
या अल्ल्हा.. रहम कर.. या लललल.. लिल्लाहया मेरे मौलाना ये क्या हुआ, फिर मत कहना दिखाया नहीं था 🖐️#oprationsindoor 🔥🚩 pic.twitter.com/UitkfUcyg4
— Deepak Sharma (@SonOfBharat7) May 7, 2025
हल्ल्याचा हा व्हायरल व्हिडिओ @SonOfBharat7 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पाकिस्तानमधील परिस्थितीचे पुरावे मागणारे,या अल्ल्हा.. रहम कर.. या लललल.. लिल्लाह, अरे माझ्या मौलाना, काय झालं, पुन्हा म्हणू नकोस की मी ते तुला दाखवलं नाही’ असे लिहिले आहे. व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ फेक असून पाकिस्तान हल्ल्याचा नसल्याचे म्हटले आहे.
व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी हा व्हिडिओ एका आठवड्यापूर्वी पाहिला आहे, हा खूप जुना व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे मूर्खा, हा व्हिडिओ पॅलेस्टाईनचा आहे, जो खरा व्हिडिओ आहे तो दाखवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.