Lashkar-e-Tayyiba Leader Abdul Rauf disclosed relation of army and government
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानचा (Pakistan) खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान अनेक वेळा तोंडावर पडला आहे, पण पाकिस्तानचा माज अजूनही उतरलेला नाही. जागतिक पातळीवर दहशतवाद विरोधी असल्याचा दावा करत फिरतो. पण आता पुन्हा एकदा त्यांची नाचक्की झाली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यानेचे त्यांचे काळे सत्य जगासमोर आणले आहे.
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) प्रमुख कमांडर हाफिज अब्दुर रौफने जगासमोर मोठा खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्य, सरकार आणि दहशतवादी सर्व एकसारखे आहेत. पख्तूनख्वाच्या लोअर दिर मध्ये त्याच्या गटाच्या दहशतवाद्यांना संबोधताना रौफने हे विधान केले आहे.
त्याने म्हटले की, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मुजफ्कराबाद, मुरीदके, बहावलपूर आणि कोटली येथे हल्ला केला होता. तेव्हा त्यांचा थरकाप उडाला होता. तसेच भारताला वाटले की दहशतवादी वेगळे आहेत. पण तसेच नाही इथे सरकार, सैन्य आणि दहशतवादी सगळे एकच आहे. दहशतवादी रौफच्या या विधानानंतर पाकिस्तान आणि जगभरात मोठी खळबळ उडाली होती.
‘अफवा पसरवू नका’ ; अफगाणिस्तानातील इंटरनेट बंदीच्या चर्चांना तालिबान सरकारने फेटाळले
यापूर्वी देखील पाकिस्तानच्या अनेक दहशतवाद्यांना, तसेच लष्कराने आणि सरकारमधील मंत्र्यांने दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारत पाकिस्तान युद्धादरम्याने उघडपणे म्हटले होते की, पाकिस्तान गेल्या अनेक काळापासून दहशतवादाला पाठिंबा देत आहे. शिवाय त्यांनी दावा केला होता की अमेरिकेच्या सांगण्यावरुन हे सर्व केले जात आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली होती.
I hope you all remember this Lashkar-e-Tayyiba Leader Abdul Rauf who lead the Funeral after Ops Sindoor. “Mujahideen (Terrorist), Fauj and Hukmaran (Pakistani Government) are working together”. pic.twitter.com/aY0OnywEf8 — 𝔸𝕓𝕙𝕚𝕟𝕒𝕧 🇮🇳 (@AbhinavInspect) October 1, 2025
ऑपरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले होती. यानंतरही पाकिस्तान पुन्हा एकदा ही तळे उभारण्यात व्यस्त झाला आहे. यामुळे सध्या जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. मात्र पहलगाम हल्ल्याने (Pahalgam Attack) पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. यामुळे पाकिस्तान भारतावर हल्ला करेल याची जरा शंकाच आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. पाकिस्तानच्या LeT च्या दहशतवाद्याने काय खुलासा केला?
पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयाबाच्या दहशतवाद्याने पाकिस्तानामधील सरकार, लष्कर आणि दहशतवादी एकच असल्याचे म्हटले आहे.
प्रश्न २. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणती दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली होती?
भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यामध्ये मुजफ्कराबाद, मुरीदके, बहावलपूर आणि कोटली यांसारख्या दहशतवादी ठिकाणांना उडवून दिले होते.
Nepal Kumari : नेपाळने केली नव्या ‘कुमारी’ची निवड; जाणून घ्या कोण आहे अडीच वर्षांची ‘देवी’…