Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा

पटना येथील गांधी मैदानात स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात भाषण करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेसाठी ४ मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये परीक्षा शुल्क १०० रुपये कमी करणे उद्योगांसाठी समावेश आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 15, 2025 | 02:58 PM
१०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा (फोटो सौजन्य- x)

१०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा (फोटो सौजन्य- x)

Follow Us
Close
Follow Us:

Bihar Election 2025 News in Marathi : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणूक वर्षात ४ नवीन घोषणा केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त पटना येथील गांधी मैदानात भाषण करताना नितीश यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा दिला. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क १०० रुपये कमी करण्याची घोषणा केली. मुख्य परीक्षेत उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, राज्यात ७ नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडण्याची, उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना अनुदान देण्याची आणि दिवाळी-छठला इतर राज्यांमधून बिहारला बसेस चालवण्याची घोषणाही करण्यात आली.

मुख्यमंत्री नितीश यांनी भाषणात सांगितले की, २००५ मध्ये सत्तेत आल्यापासून ते बिहारच्या विकासासाठी काम करत आहेत. गेल्या २० वर्षांत लोकांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. याच अनुषंगाने आता ते काही नवीन घोषणा करत आहेत.

लाल किल्ल्यावरून मोदींकडून RSSचे कौतुक…; काँग्रेस नेत्यांनी थेट इतिहासच काढला

शुल्क आकारले जाणार नाही

मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, मुख्य परीक्षेतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर पूर्व परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षेत उमेदवारांकडून परीक्षा शुल्क म्हणून फक्त १०० रुपये आकारले जातील.

उद्योग उभारणीसाठी विशेष मदत

गांधी मैदानाच्या व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, बिहारमध्ये नवीन उद्योग उभारणीसाठी राज्य सरकारने विशेष मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, व्यावसायिकांना भांडवली अनुदान, बिहार अनुदान, जीएसटी यासाठी दिले जाणारे प्रोत्साहन दुप्पट केले जाईल. तसेच, सरकार नवीन उद्योग उभारणीसाठी जमीन प्रदान करेल. जर त्या जमिनीवर कोणताही वाद असेल तर तो देखील त्वरित सोडवला जाईल. पुढील ४ महिन्यांत उद्योगपतींना ही सुविधा दिली जाईल.

७ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये सुरू करण्याची घोषणाही केली. याअंतर्गत किशनगंज, कटिहार, अरवल, शिवहार, रोहतास, लखीसराय आणि शेखपुरा जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होतील. तसेच मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले की, छठ, दिवाळीसारख्या सणांना बिहारबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी दिल्ली, गुरुग्राम, चंदीगड सारख्या शहरांमधून राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात बसेस चालवल्या जातील. जेणेकरून स्थलांतरितांना घरी येताना कोणतीही गैरसोय होऊ नये. तसेच, केंद्र सरकारला पुरेशा संख्येने विशेष गाड्या चालवण्याची विनंती केली जाईल.

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने

Web Title: Bihar exam fee reduced subsidy for industries nitish kumar independence day 4 announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • bihar
  • Nitish Kumar

संबंधित बातम्या

Bihar SIR: बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; सर्वोच्च न्यायालयाचे राजकीय पक्षांना मदतीचे आदेश
1

Bihar SIR: बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; सर्वोच्च न्यायालयाचे राजकीय पक्षांना मदतीचे आदेश

PM असो वा CM मुख्यमंत्री…, भ्रष्टाचारी हा तुरुंगातच जाणार, पंतप्रधान मुख्यमंत्री विधेयकावर मोदींचा महत्त्वाचा निर्णय
2

PM असो वा CM मुख्यमंत्री…, भ्रष्टाचारी हा तुरुंगातच जाणार, पंतप्रधान मुख्यमंत्री विधेयकावर मोदींचा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
3

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार
4

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.