पंतप्रधान मोदींनी केले संघाचे कौतुक ( फोटो-टीम नवराष्ट्र)
१. भारताचा आज ७९ वा स्वातंत्र्यदिन
२. पंतप्रधान मोदींकडून संघाचे कौतुक
३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदा शताब्दी वर्ष
नवी दिल्ली/Independence Day: आज आपला भारत देश ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पारतंत्र्यातून मुक्त होऊन आपल्याला ७९ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास १०३ मिनिटे देशाला संबोधित केले. गेल्या काही वर्षांमधील भाषण करण्याचा रेकॉर्ड त्यांनी मोडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील कौतुक केले आहे. यावर्षी संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मोदींच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.
आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी आरएसएसचे कौतुक केले. जगातील सर्वात मोठी गैर-सरकारी संस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज मी अभिमानाने सांगू इच्छितो, १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या एका संघटनेचा जन्म झाला. १०० वर्षे राष्ट्रसेवा हा एक सुवर्ण अध्याय आहे. राष्ट्रीय स्वयंमेवक संघाला १०० वर्षांचा इतिहास आहे. जगातील सगळ्यात मोठी गैर सरकारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.”
#WATCH | PM Narendra Modi says, "Today, I would like to proudly mention that 100 years ago, an organisation was born – Rashtriya Swayamsevak Sangh (RSS). 100 years of service to the nation is a proud, golden chapter. With the resolve of 'vyakti nirman se rashtra nirman', with the… pic.twitter.com/zGMb8H0arw
— ANI (@ANI) August 15, 2025
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “व्यक्ती निर्माणापासून ते राष्ट्र उभारणीच्या दृढ संकल्पाने, भारतमातेच्या कल्याण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी आपले जीवन समर्पित केले.
नरेंद्र मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज मी एका चिंतेबद्दल आणि आव्हानाकडे तुमचे लक्ष वेधत आहे. एका सुनियोजित कटाच्या अंतर्गत, देशाची लोकसंख्या बदलली जात आहे, भारतात एका नवीन संकटाची बीजे पेरली जात आहेत, हे घुसखोर माझ्या देशातील तरुणांचे जीवनमान हिरावून घेत आहेत, हे घुसखोर माझ्या देशातील बहिणी आणि मुलींना लक्ष्य करत आहेत. हे घुसखोरांकडून निष्पाप आदिवासींची दिशाभूल करून त्यांच्या जमिनींवर हडपल्या केला जात आहेत. म्हणून, जेव्हा लोकसंख्याशास्त्रीय बदल होतो तेव्हा सीमावर्ती भागात असे घडते, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी संकट निर्माण होते.