Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेल्मेट न घातल्याने कार मालकाला दंड! ‘या’ अजब चालानची सर्वत्र चर्चा

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका कार मालकाला मोटार वाहन कायद्यांतर्गत 'हेल्मेट न घातल्याबद्दल' १,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 11, 2025 | 04:49 PM
हेल्मेट न घातल्याने कार मालकाला दंड! ‘या’ अजब चालानची सर्वत्र चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही कधी ऐकले आहे का की एखाद्या कार मालकाला ‘हेल्मेट न घातल्यामुळे’ दंड भरावा लागला? कायद्यानुसार, दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. पण, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका कार मालकाला मोटार वाहन कायद्यांतर्गत ‘हेल्मेट न घातल्याबद्दल’ १,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हे प्रकरण सोशल मीडियावर एका चालानचा फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आले, ज्यामध्ये दुचाकी वाहनाच्या उल्लंघनाचा उल्लेख होता, पण चालानवर फोटो मात्र कारचा होता.

नक्की काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमध्ये एक तरुण त्याची कार चालवत असताना त्याला त्याच्या मोबाईलवर एका चालानचा मेसेज आला. जेव्हा त्याने चालान पाहिले, तेव्हा त्यात हेल्मेट न घातल्यामुळे दंड झाल्याचे लिहिले होते. हे पाहून कार चालकाला मोठा धक्का बसला, कारण कार चालकांसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य नाही. या संपूर्ण घटनेमुळे चालान जारी करताना मोठी निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल झालेला चालान राजनगर एक्स्चेंशनमधील एका चौकात उभ्या असलेल्या कारचा होता.

हे देखील वाचा: खळबळजनजक! गाझियाबादमध्ये महिलेला दारू पाजून ज्योतिषाने केले अश्लील कृत्य

पोलिसांनी काय म्हटले?

या अजब चालाननंतर पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही केवळ एक ‘मानवी चूक’ आहे. एका वाहतूक उपनिरीक्षकाने नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या कारचा फोटो काढला होता, परंतु चुकून तो फोटो एका दुचाकीच्या चालानवर जोडला गेला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना अतिरिक्त पोलिस उपायुक्त (वाहतूक) सच्चिदानंद म्हणाले, “ही केवळ एक मानवी चूक आहे. हे कसे घडले याची आम्ही चौकशी करत आहोत.”

Web Title: Bizarre challan ghaziabad car owner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Nation News
  • Uttar Pradesh
  • without helmet

संबंधित बातम्या

भाजप आमदार Hardik Patel यांच्या अडचणी वाढल्या, अहमदाबाद ग्रामीण न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
1

भाजप आमदार Hardik Patel यांच्या अडचणी वाढल्या, अहमदाबाद ग्रामीण न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

अरे बापरे! ऑनलाइन गेमने केली करणी; आता कर्ज फेडण्यासाठी तरुणाने विकायला काढली किडनी
2

अरे बापरे! ऑनलाइन गेमने केली करणी; आता कर्ज फेडण्यासाठी तरुणाने विकायला काढली किडनी

Breaking: सियाचीन ग्लेशियरमध्ये भीषण हिमस्खलन; दोन अग्निवीरांसह तीन लष्करी जवान शहीद, बचावकार्य सुरू
3

Breaking: सियाचीन ग्लेशियरमध्ये भीषण हिमस्खलन; दोन अग्निवीरांसह तीन लष्करी जवान शहीद, बचावकार्य सुरू

Punjab Floods: पंजाबमधील पुरामुळे भगवंत मान सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई
4

Punjab Floods: पंजाबमधील पुरामुळे भगवंत मान सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.