
अयोध्येनंतर आता काशी मंदिरात सोने चोरी! तक्रारीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी सुरु
सुवर्णशिखराच्या अन्य भागांतील लहान तुकड्यांमधूनही सोने गायब झाल्याचा आरोप राय यांनी केला आहे. काही भागांवरील सोन्याचा मुलामा सैल झाला असून, तो जोरदार वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणांनी खाली पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आयआयटी मद्रासकडून दुरुस्ती
दरम्यान, मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रवेशद्वाराच्या वर बसविलेला एक सुवर्णकलश काही दिवसांपूर्वी माकडांच्या उड्या मारण्यामुळे खाली पडला होता. हा कलश सुरक्षितपणे भांडारगृहात ठेवण्यात आला आहे. तांत्रिक तपासणी केल्याशिवाय तो पुन्हा बसविणे योग्य ठरणार नसल्याने आयआयटी मद्रासशी संपर्क साधण्यात आला आहे. संस्थेच्या पथकाने प्राथमिक पाहणी केली असून, संपूर्ण सुवर्णशिखराच्या दुरुस्तीची शिफारस केली आहे.
विभागीय आयुक्त एस. राजलिंगम यांनीही एका घटनेत सुवर्णकलश खाली पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हा कलश सुरक्षित ठेवण्यात आला असून, आयआयटी मद्रासच्या मदतीने तो लवकरच पुन्हा बसविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा
मंदिर प्रशासनाने श्वेतपत्रिका काढावी
काशी विश्वनाथ मंदिर परिसरात ज्या ठिकाणी सोने आणि चांदीचा वापर करण्यात आला आहे, त्याची सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका मंदिर प्रशासनाने प्रसिद्ध करावी, अशी मागणी राय यांनी कैली आहे. ही माहिती मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
Ans: मंदिराच्या सुवर्णशिखरावरील सोन्याबाबत तक्रार करण्यात आली असून, त्याच्या स्थितीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Ans: मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, माकडांमुळे एक सुवर्णकलश खाली पडला होता. तो सुरक्षितपणे ठेवण्यात आला आहे.
Ans: तक्रारीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी सुरू झाल्याचे वृत्त आहे. मंदिर प्रशासनानेही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.