विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा पश्चिम बंगाल दौरा (फोटो - सोशल मीडिया)
Amit Shah in West Bengal : पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २९४ जागांच्या निवडणूका होणार असून तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. आणि प्रचाराचा जोर वाढला आहे. पश्चिम बंगालसाठी (West Bengal) भाजप खास रणनीती आखत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २८ मार्च रोजी राज्याचा दौरा करणार आहेत. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधात चार्ज शीट दाखल करण्यात येणार आहे.
ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून पश्चिम बंगालसाठी खास रणनीती आखली जात आहे. जोरदार प्रचार आणि आकर्षक वचनांची खैरात वाटली जात आहे. प्रचाराच्या रिंगणात भाजपचे चाणक्य अमित शाह उतरणार आहेत. येत्या 28 मार्च रोजी अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर येणार आहेत. निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर, या दौऱ्यात ते एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (टीएमसी) विरुद्ध औपचारिकपणे आरोपपत्र दाखल करणार आहेत. यामध्ये सत्ताधारी पक्षावरील भाजपच्या आरोपांची रूपरेषा असेल.
हे देखील वाचा : लोणावळा घाटात पुन्हा भीषण वाहतूक कोंडी; ४-५ किमी वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त
पश्चिम बंगालसाठी भाजपकडून राजकारण केले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या आरोपपत्रात गेल्या अनेक वर्षांतील ममता बॅनर्जी सरकारच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार, प्रशासकीय अपयश आणि कायदा व सुव्यवस्थेच्या समस्यांचा तपशील असण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संकेत दिले आहेत की, हे आरोपपत्र शिक्षक भरतीमधील अनियमितता आणि आर्थिक अनियमिततेवर लक्ष केंद्रित करणार आहे.
हे देखील वाचा : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?
सरकारविरोधात भाजपचे श्वेतपत्र
आरोपपत्राव्यतिरिक्त, भारतीय जनता पक्ष तृणमूल काँग्रेस सरकारच्या १५ वर्षांच्या “गैरकारभार आणि भ्रष्टाचारावर” प्रकाश टाकणारे एक श्वेतपत्रही प्रसिद्ध करणार आहे. राज्यातील प्रशासकीय त्रुटींबाबत पक्षाच्या दाव्यांना पाठिंबा देण्यासाठी या श्वेतपत्रात अनेक आकडेवारी आणि केस स्टडीज सादर होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील कथित “माफिया राजवटी”सारख्या मुद्द्यांवर आपला राजकीय संदेश अधिक मजबूत करण्यावरही भाजप काम करणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका
निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल एक असून, येथे एकूण २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होईल. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाईल.






