1993 Bomb Blast:
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी आमदार आर.पी. सिंह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेऊन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १९९३ च्या दिल्ली बॉम्बस्फोटातील दोषी दविंदर पाल सिंग भुल्लर याच्या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
आर.पी. सिंह यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, “भुल्लरची मानसिक स्थिती आता खूपच खराब झाली आहे. तो कोणालाही ओळखत नाही आणि त्याला बोलतण्यातही अडचणी येत आहेत. तो अनेक वर्षांपासून स्किझोफ्रेनियाने ग्रस्त आहे. पंजाबमधील अमृतसर मेडिकल कॉलेजच्या मानसोपचार विभागात उपचार घेत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, भुल्लरचा खटला शिक्षा पुनरावलोकन मंडळासमोर (एसआरबी) पुन्हा सादर करावा आणि विचार केल्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करण्यात यावेत, असे आदेश दिले होते.असही आर.पी. सिंह यांनी नमुद केलं. त्यामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना या आदेशाचे पालन करण्याचे आणि भुल्लरचा खटला लवकरात लवकर एसआरबीच्या पुढील बैठकीसमोर मांडण्याचे आवाहन आर.पी. सिंह यांनी केले आहे.
आर.पी. सिंह यांनी त्यांच्या पत्रात आणखी एका गोष्टीची आठवण करून दिली आहे. “सर्वोच्च न्यायालयाने मानवतेच्या आधारावर भुल्लरची फाशीची शिक्षा आधीच जन्मठेपेत बदलली आहे. इतके दिवस तुरुंगात आणि रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांची प्रकृती लक्षणीयरीत्या बिघडली आहे. त्यामुळे त्याच्यावर दया आणि करुणा दाखवावी.”
Maharashtra Rain Alert: ऐन दिवाळीत पाऊस धुमाकूळ घालणार; ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट
१९९३ मध्ये दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या दविंदर पाल सिंह भुल्लर यांची मृत्युदंडाची शिक्षा अखेर १३ वर्षांनंतर जन्मठेपेत बदलण्यात आली आहे. 1993 च्या स्फोटांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. भुल्लर हा त्या काळात खलिस्तान लिबरेशन फोर्सशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले
२००१ मध्ये दिल्लीतील विशेष न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेत बदल करून ती जन्मठेपेत बदलण्यात आली.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते आर. पी. सिंह म्हणाले की, “हा न्यायापेक्षा मानवतावादी करुणेचा काळ आहे.” त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे आणि गंभीर आजारी कैद्याला दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.