Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला होत असलेल्या विरोधावर भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. शुद्ध पेट्रोल उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना सवाल केला.

  • By विवेक
Updated On: Aug 10, 2026 | 06:16 PM
Ethanol statement Janardan Mishra

Ethanol statement Janardan Mishra

Follow Us
Follow Us:
  • ‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’ असा सवाल जनार्दन मिश्रा यांनी केला
  • भारताने इथेनॉलचा वापर वाढवण्याची गरज असल्याचा खासदारांचा दावा
  • ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर इथेनॉलचा वापर होत असल्याचा मिश्रा यांनी केला उल्लेख
 

भोपाळ : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावरून देशात चर्चा सुरू असतानाच भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मध्य प्रदेशातील रिवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

कोलकाता-रीवा-भोपाळ विमानसेवेच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात जनार्दन मिश्रा नागरिकांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी देशातील इंधनाची गरज, कच्च्या तेलाची आयात आणि इथेनॉल मिश्रणाबाबत आपली भूमिका मांडली.

इथेनॉलच्या विरोधकांना खासदारांचा सवाल

इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावर बोलताना जनार्दन मिश्रा यांनी भारतातील कच्च्या तेलाच्या उत्पादनाचा आणि आयातीचा संदर्भ दिला. देशाच्या इंधन गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याचा दावा त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असं सांगत भारताने पर्यायी इंधन स्रोतांचा विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’

याच मुद्द्यावरून इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना त्यांनी म्हटलं, “देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नाही, तर ते कुठून आणणार? शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येईल का?” या वक्तव्यामुळे जनार्दन मिश्रा टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

‘ब्राझीलमध्ये १०० टक्के इथेनॉलवर गाड्या’

इथेनॉलचा वापर योग्य असल्याचं सांगताना मिश्रा यांनी ब्राझीलचं उदाहरण दिलं. ब्राझीलमध्ये इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

भारतातील वाहनांमध्येही इथेनॉल मिश्रित इंधन वापरण्याची क्षमता असल्याचं सांगत त्यांनी वाहन उत्पादक कंपन्यांचा हवाला दिला. पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी करण्यासाठी देशाने पर्यायी इंधनाचा विचार करायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

देश आत्मनिर्भरतेकडे जात असल्याचा दावा

कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांनी भारताच्या आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचाही उल्लेख केला. देशात रोजगाराच्या संधी वाढत असून भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच संरक्षण साहित्याच्या निर्यातीचा उल्लेख करत भारताची जागतिक पातळीवरील क्षमता वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.

होर्मुझ संकटातही इंधनटंचाई नाही; पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा दावा

दरम्यान, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. इथेनॉलमुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो का, इंधनाच्या किंमतीवर त्याचा काय परिणाम होतो आणि शेतकऱ्यांसाठी त्याचे काय फायदे आहेत, यावर विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्यामुळे इथेनॉलचा मुद्दा पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Web Title: Bjp mp janardan mishra ethanol petrol controversial statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • BJP
  • Ethanol Petrol
  • Nitin Gadkari
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
1

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
2

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.