Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Market : साखरेच्या काळाबाजाराला आता बसणार आळा; सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

शासकीय संस्था आणि सार्वजनिक वितरण प्रणाली वगळता इतर विक्रेते व वितरकांना साखर मिळाल्यापासून ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. तसेच कोणत्याही ठिकाणी ४ हजार क्विंटल अर्थात ४०० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर साठवता येणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 28, 2026 | 10:54 AM
साखरेच्या काळाबाजाराला आता बसणार आळा; सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

साखरेच्या काळाबाजाराला आता बसणार आळा; सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : साखरेचा काळाबाजार, साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने व्यापारी, वितरक आणि मोठ्या ग्राहकांच्या साखर साठ्यावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार राज्यभर संयुक्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या २८ जुलैच्या आदेशानुसार १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साखरेवर साठा निर्बंध लागू आहेत.

शासकीय संस्था आणि सार्वजनिक वितरण प्रणाली वगळता इतर विक्रेते व वितरकांना साखर मिळाल्यापासून ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. तसेच कोणत्याही ठिकाणी ४ हजार क्विंटल अर्थात ४०० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर साठवता येणार नाही. दरमहा १० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर मिळाल्यापासून केवळ १५ दिवसांपर्यंतच साठा ठेवता येणार आहे. सर्व संबंधितांना अन्नसाठा देखरेख संकेतस्थळावर नोंदणी करून दर शुक्रवारी साठ्याची माहिती अद्ययावत करावी लागेल.

दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात आली असून, व्यापाऱ्यांची गोदामे, पोत्यांची संख्या, खरेदी-विक्री नोंदी आणि वाहतूक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. घोषित आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत किंवा नियमभंग आढळल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

साखरेचा दर १०० रुपये किलोवर जाणार?

साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असून, येत्या काळात साखरेचा दर १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज राहुरी तालुक्यातील तनपुरे साखर कारखान्याचे संचालक सुरेश करपे यांनी व्यक्त केला आहे. साखरेच्या वाढत्या दराचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी शेतकरी नेते रवी मोरे यांनी केली आहे. उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. साखरेचा दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होणार आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी

Web Title: Black marketing of sugar to be curbed now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • national news
  • Sugar Market

संबंधित बातम्या

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!
1

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.