Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prayagraj Accident: महाकुंभला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू तर 19 जखमी

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. लाखों भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 15, 2025 | 02:01 PM
Prayagraj Accident: महाकुंभला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू तर 19 जखमी

Prayagraj Accident: महाकुंभला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू तर 19 जखमी

Follow Us
Follow Us:

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. लाखों भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. दरम्यान प्रयागराजमध्ये एक भीषण अपघात घडली आहे. बोलेरो गाडी आणि बसची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टर 19 प्रवाशी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी बोलेरोमधून प्रवास करत होते.

प्रयागराज- मिर्झापुर हायवेवर बोलेरो आणि बसचा भीषण अपघात झाला. छत्तीसगडमधील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या दिशेने चालले होते. मात्र काळाने त्यांच्यावर  महाकुंभला जाण्याआधीच घाला घातला आहे. यामध्ये 19 प्रवासी जखमी झाले आहेत. हे 19 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यात राहणारे प्रवासी होते.

अपघाताची माहिती कळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाईस सुरुवात केली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी

 मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावर सिन्नरजवळ एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती साईड अँगलला धडकली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी रत्नागिरी येथील असून, ते प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांना हा दुर्दैवी अपघात झाला.

रत्नागिरी येथील सात जण कारने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे, ते समृद्धी महामार्गाने घरी परतत असताना वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलढोण शिवारात सकाळी सुमारे सहाच्या सुमारास त्यांच्या कारवरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे ती पुढील वाहनावर धडकली. या भीषण अपघातात रत्नागिरी माळनाका येथील डीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई (६९), अथर्व किरण निकम (२४) आणि चालक भाग्यवान झगडे (५०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच निवृत्त सहाय्यक निबंधक किरण निकम (५८), रमाकांत पांचाळ (६०), रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज (५०) आणि प्रांजल प्रकाश साळवी (२४) हे जखमी झाले आहेत.  किरण निकम यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा: Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी

घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याची गरज असल्याची मागणी होऊ लागली आहे.

 

Web Title: Bolero and bus accident 10 peoples loss their life chattisgarh to mahakumbh latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • Accident
  • Accident News
  • Mahakumbh 2025
  • Prayagraj

संबंधित बातम्या

Thailand Accident : थायलंडमध्ये भीषण अपघात! अल्पवयीन मुलाने यात्रेकरुंच्या अंगावर चढवला ट्रक; ८ बौद्ध भिक्षूंचा दुर्दैवी मृत्यू
1

Thailand Accident : थायलंडमध्ये भीषण अपघात! अल्पवयीन मुलाने यात्रेकरुंच्या अंगावर चढवला ट्रक; ८ बौद्ध भिक्षूंचा दुर्दैवी मृत्यू

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
2

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर
3

रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…
4

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.