BJP Loksabha Election Candidate list : भाजपने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
नवी दिल्ली : आगामी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती. ही बैठक रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल झाला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या बैठकीत 150 ते 200 उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आज अखेर भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काही सेलिब्रिटींनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भाजपकडून युवराज सिंग याला पंजाबच्या गुरदासपूर या प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तर अभिनेता अक्षय कुमार याला चंदीगढ किंवा दिल्लीतील एखाद्या लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे.
लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपकडून सर्व इच्छूक नेत्यांची खोलवर जाऊन चौकशी करण्यात आली होती. संबंधित लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांना पाठवून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. तसेच नमो अॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून विद्यमान खासदारांविषयी माहिती जाणून घेण्यात आली होती. लोकसभेच्या एका जागेसाठी दोन ते तीन नेत्यांचा विचार करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम उमेदवाराची निवड करण्यात आली.
Web Title: Breaking first list of lok sabha 2024 candidates announced by bjp who got a chance and some got cut read in detail nryb