‘सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. तहसील कार्यालय म्हसळा तसेच विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लाभार्थी नागरिकांना विविध योजनांतर्गत अतिक्रमण नियमानुकूल आदेश, स्वामित्व सनद, विविध दाखले, शिधापत्रिका, वनहक्क दाव्यांअंतर्गत ७/१२ उतारे, विवाह प्रमाणपत्रे, महिला बचत गट नोंदणी, कृषी यांत्रिकीकरणाचे लाभ, आयुष्मान भारत कार्ड आणि घरकुल लाभ यांचे वितरण करण्यात आले.
याशिवाय पोस्ट विभागाच्या विविध योजनांचा लाभ, सिंचन विहीर लाभ, प्रलंबित फेरफार निर्गती आणि ‘जिवंत ७/१२’ मोहिमेचा लाभही नागरिकांना देण्यात आला. महावितरण विभागामार्फत उपलब्ध योजनांचाही लाभ नागरिकांना देण्यात आला. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेमुळे शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगत खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी तहसीलदार सचिन खाडे आणि प्रांताधिकारी महेश पाटील उपस्थित होते.