(फोटो सौजन्य: Pinterest)
आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम
अनेकदा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडतं तेव्हा त्याच्या बाईकसारीक गोष्टी आपण दुरुनच नोटीस करु लागतो. पण अनेकांना हे ठाऊक नाही की कधीकधी आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच्या मनातही आपल्यासारख्याच प्रेमाच्या भावना तयार होत असतात. आता आपल्या क्रशच्या मनात आपल्याविषयी प्रेमाच्या भावना आहेत की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करुन पाहू शकता. यातून त्याच्या मनातील सीक्रेट्स जाणून घेण्यात मदत होईल.
संभाषणासाठी प्रयत्न
नातं सुरु करण्यासाठी थोडफार संभाषण महत्त्वाचं आहे. अशात फक्त कामापुरतं हो आणि नाही न बोलता जर तुमचा क्रश तुमच्यासोबत अधिक बोलण्याचा प्रयत्न करत असेल किंवा नवीन गोष्टीवरुन तुमच्यासोबत बोलण्याचा बहाणा शोधत असेल तर याचा अर्थ त्यालाही तुम्ही आवडत असाल. जर असे पुन्हा पुन्हा घडून येत असेल, व्यक्ती तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ तर कदाचित त्या व्यक्तीच्या मनातही तुमच्याबद्दल आकर्षण असू शकते.
तुमच्यासाठी वेळ काढणे
एखाद्या व्यक्तीबद्दल आवड निर्माण होण्याची भावना अनेकदा मोठ्या कृतींमधून नाही तर लहान कृतींमधून दिसून येते. समोरील व्यक्ती तुमच्यासोबत जास्त वेळ घालवत असेल, तो तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बहाणे शोधत आहे किंवा नकळत तुम्हाला सतत पाहण्याचा प्रयत्न करत आहे. या काही संकेतांवरुन तुम्ही क्रशच्या मनातील भावनांना ओळखण्याचा प्रयत्न करु शकता.
हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत
व्यवहारातील बदल
तुमच्याशी बोलताना जर तो थोडा नर्व्हस होत असेल, त्याच्या आवाज मृदू होत असेल, तो तुमची काळजी घेत असेल किंवा तुमच्या लहान-सहान गोष्टी लक्षात ठेवत असेल तर त्याच्या मनात तुमच्यासाठी भावना निर्माण होण्याची शक्यता टाळली जाऊ शकत नाही. जर तुमच्या क्रशला तुम्ही आवडत असाल, तर त्याला तुमच्या भविष्यातील योजना, विचार, कुटुंब, स्वप्ने आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.






