Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: वित्तीय शिस्तीवर सरकारचा भर; तुटीचे प्रमाण ४.३% वर आणण्याची घोषणा

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत एकूण उत्पन्न ₹२५.२५ लाख कोटी होते, जे पूर्ण वर्षाच्या उद्दिष्टाच्या ७२.२% आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकूण खर्च ₹३३.८१ लाख कोटी होता

  • By anuradha sagar
Updated On: Feb 01, 2026 | 01:32 PM
Budget 2026, FM Sets Fiscal Deficit Target at 4.3%

Budget 2026, FM Sets Fiscal Deficit Target at 4.3%

Follow Us
Follow Us:
  • निर्मला सीतारमण सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे
  • चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी राजकोषीय तूट ४.४% राहण्याचा अंदाज
  • प्राप्तिकर सवलतींमध्ये  १२ लाख रुपयांपर्यंत वाढ
Union Budget 2026 Live Updates:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (1 फेब्रुवारी) २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारमण सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी ऐतिहासिक असेल. पहिल्यांदाच, रविवारी अर्थसंकल्प सादर केला जात असून गेल्या दशकभरातील परंपरेत बदल करणारा आहे. अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी भारताच्या राजकोषीय तुटीची आकडेवाडी जाहीर केली आहे.

Budget 2026: चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार, तुमच्या खिशातले किती पैसे वाचणार? वाचा सविस्तर बातमी

आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत (एप्रिल-डिसेंबर कालावधी) भारताची राजकोषीय तूट ₹८.५५ लाख कोटी होती. ही २०२५ च्या अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या ५४.५% आहे. ही माहिती शुक्रवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून मिळाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत, संपूर्ण आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टाच्या ५६.७% राजकोषीय तूट होती.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत एकूण उत्पन्न ₹२५.२५ लाख कोटी होते, जे पूर्ण वर्षाच्या उद्दिष्टाच्या ७२.२% आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकूण खर्च ₹३३.८१ लाख कोटी होता, जो या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या ६६.७% आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत, एकूण उत्पन्न अंदाजे उद्दिष्टाच्या ७२.३% होते, तर खर्च ६७% होता.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत निव्वळ कर प्राप्ती ₹१९.४ लाख कोटी होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत गोळा झालेल्या ₹१८.४ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. करेतर महसूल ₹५.४ लाख कोटींपर्यंत वाढला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ₹४.५ लाख कोटी होता.

Budget 2026 Live: पर्यटन क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

खर्चात घट

एकूण सरकारी खर्च ₹३३.८ लाख कोटींपर्यंत वाढ झाली. हाच खर्च गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ₹३२.३ लाख कोटी होता. अर्थव्यवस्था आणि रोजगारावर सरकारचे लक्ष केंद्रित असल्याने महामार्ग, बंदरे आणि रेल्वेसारख्या पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ₹६.९ लाख कोटींवरून वाढून ₹७.९ लाख कोटींवर पोहोचला.

राजकीय तूट लक्ष्य ४.४ जीडीपीचे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट लक्ष्य जीडीपीच्या ४.४ टक्के, म्हणजेच १५.७ लाख कोटी रुपये ठेवले आहे. देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तूट कमी करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे. सुधारित अंदाजानुसार, २०२४-२५ साठी भारताची राजकोषीय तूट जीडीपीच्या ४.८ टक्के होती.

राजकोषीय तूट म्हणजे सरकारी महसूल आणि खर्चातील फरक. जर सरकार कमाईपेक्षा जास्त खर्च करत असेल तर त्या फरकाला राजकोषीय तूट म्हणतात. समजा सरकारचा वार्षिक महसूल (कर, शुल्क इ.) १०० रुपये आहे आणि त्याचा खर्च (पगार, रस्ते, रेल्वे, योजना इ.) १२० रुपये आहे, तर २० रुपयांच्या फरकाला राजकोषीय तूट म्हणतात.

Web Title: Budget 2026 fm sets fiscal deficit target at 43 to boost economic stability

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Budget 2026-2027
  • national news
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
1

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!
3

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.