पर्यटन क्षेत्रासाठी अर्थसंकल्प 2026 मध्ये खास तरतूद करण्यात आली आहे (फोटो - AI)
भारतामध्ये वैविध्यपूर्ण पर्यटन क्षेत्र आहे. निसर्ग, संस्कृती आणि परंपरा याचा अनोखा संगम असलेले पर्यटन भारताला लाभले आहे. यामध्ये पर्वतरांगा, हिमालयीन प्रदेश, तिन्ही बाजूंनी समुद्र किनारा आणि जाज्वंल इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकिल्ले अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा कल वाढवण्यासाठी आणि त्यामधून रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूदी केल्या आहेत. याबाबत निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये भाषणामध्ये घोषणा केली आहे.
हे देखील वाचा : विरोधकांना अर्थसंकल्पातून नाही कोणती अपेक्षा; प्रियांका गांधींचा नाराजीचा सूर
काय आहे पर्यटन क्षेत्रासाठी तरतूद?
अर्थसंकल्प 2026 मध्ये पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. देशातील २० महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्रावर १० हजार गाईड्सचे निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे परदेशातून भारताच्या पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना परिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली जाईल. तसेच यामुळे रोजगार निर्मिती देखील होणार आहे. या घोषणेमुळे स्थानिक लोकांना टुरिस्ट गाईड म्हणून पर्यटकांना माहिती देण्याची संधी मिळेल. तसेच यानिमित्ताने मूळ गावीच रोजगाराची संधी देखील उपलब्ध होईल.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी पर्यटन क्षेत्राबाबत एक मोठी घोषणा केली. येत्या काळात देशातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. त्याचबरोबर देशामध्ये नवी सांस्कृतिक केंद्राची उभारणी केली जाणार आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा हातभार लागणार असून अर्थिक स्थिती देखील सुधारली जाईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पर्वतीय मार्ग बांधले जातील अशी महत्त्वपूर्ण माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा
त्याचबरोबर पाच ईशान्येकडील राज्यांमध्ये पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल. राष्ट्रीय आतिथ्य संस्था स्थापन केली जाईल आणि १५ पुरातत्वीय स्थळे जीवंत स्थळे म्हणून विकसित करण्याचे ध्येय असल्याचे देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. डिजिटल नॉलेज ग्रिडवरील पर्यटन स्थळांची माहिती दिली जाणार असून ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी योजना आखण्यात येणार आहे. तसेच टीसीएस परदेशी टूर पॅकेजेसमध्ये २ टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले.






