Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Government : ‘या’ सरकारी योजना बंद होणार? आर्थिक वर्षात सरकारची काय आहे योजना?

येत्या आर्थिक वर्षात सरकार सर्व केंद्रीय आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये खर्चाची गुणवत्ता, निधीचा वापर आणि प्रत्येक योजनेच्या निकालांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 24, 2025 | 01:10 PM
'या' सरकारी योजना बंद होणार? आर्थिक वर्षात सरकारची काय आहे योजना? (फोटो सौजन्य-X)

'या' सरकारी योजना बंद होणार? आर्थिक वर्षात सरकारची काय आहे योजना? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

नवीन आर्थिक वर्ष एका आठवड्यानंतर सुरू होणार आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे बदल दिसून येतील. विशेष म्हणजे केंद्र सरकार या आर्थिक वर्षात त्यांच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, सरकार येत्या आर्थिक वर्षात सर्व केंद्रीय आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात येईल, ज्यामध्ये खर्चाची गुणवत्ता, निधीचा वापर आणि प्रत्येक योजनेच्या निकालांवर भर दिला जाईल. नवीन वित्त आयोग चक्र सुरू होण्यापूर्वी दर पाच वर्षांनी हा आढावा घेतला जातो, ज्याचा उद्देश अनावश्यक योजना काढून टाकणे आणि निधीचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करणे आहे.

RSS चे औरंगजेबाची कबरीबाबत मत काय? सरचिटणीस दत्तात्रय होसबळेंचे वक्तव्य चर्चेत

ईटीच्या अहवालात अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मूल्यांकनात अनेक पॅरामीटर्स समाविष्ट असतील. ज्यामध्ये एखादी योजना तिचे उद्दिष्ट पूर्ण करत आहे की समान राज्यस्तरीय योजनांसह ओव्हरलॅप होत आहे, ” लहान योजना विलीन किंवा टप्प्याटप्प्याने बंद करता येतील का?” योजनांच्या अंमलबजावणीत राज्यांनी कशी कामगिरी केली आहे यावरही आढावा लक्ष केंद्रित करेल, असे त्या व्यक्तीने सांगितले. प्रक्रियेचा एक भाग म्हणून, खर्च विभागाने या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या नोडल मंत्रालयांकडून सूचना मागवल्या आहेत. “आम्हाला सामाजिक क्षेत्रातील योजनांसाठी काही उपयुक्त सूचना मिळाल्या आहेत,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

२०२६ च्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारच्या प्रमुख १० योजनांचा अर्थसंकल्प

मनरेगा ८६,०००
जल जीवन मिशन ६७,०००
पीएम किसान ६३,५००
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ५४,८३२
एकूण शिक्षण ४१,२५०
राष्ट्रीय आरोग्य अभियान ३७,२२७
पंतप्रधान आवास योजना शहरी २३,२९४
सुधारित व्याज अनुदान योजना २२,६००
सक्षम अंगणवाडी आणि पोषण २१,९६०
नवीन रोजगार निर्मिती योजना २०,०००

विभागाने NITI आयोगाला असे क्षेत्र ओळखण्यास सांगितले आहे, जिथे राज्य योजना केंद्र पुरस्कृत योजना (CSS) सारख्या आहेत. वित्त आयोगासमोर सादर करण्यापूर्वी, योजना सध्याच्या स्वरूपात सुरू ठेवण्याच्या, सुधारित करण्याच्या, विस्तारित करण्याच्या, कमी करण्याच्या किंवा बंद करण्याच्या गरजेबद्दल शिफारशींसह अधिकृत थिंक टँक एप्रिलपर्यंत एक अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, खर्च विभाग वित्त आयोगासमोर सादर करण्यापूर्वी आयोग आणि विविध मंत्रालयांकडून मिळालेला अभिप्राय विचारात घेईल.

CSS चे बजेट किती आहे?

प्रमुख CSS योजनांमध्ये आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA), प्रधानमंत्री आवास योजना-शहरी आणि PMAY-ग्रामीण, जल जीवन मिशन (JJM) आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०१५ मध्ये सीएसएसच्या सुसूत्रीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचा एक उप-गट स्थापन केला आणि योजनांची संख्या १३० वरून ७५ पर्यंत कमी करण्यात आली. केंद्राने २०२५-२६ साठी CSS साठी ५.४१ लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्राने ५.०५ लाख कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले होते, जे नंतर ४.१५ लाख कोटी रुपयांपर्यंत सुधारित करण्यात आले.

न्या. यशवंत वर्मांवर पुढे काय कारवाई होणार; अशी आहे सर्वोच्च न्यायालयाची प्रक्रिया?

Web Title: Central government will central government end welfare schemes big planning is going on behind the scenes news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • Government
  • india
  • narendra modi

संबंधित बातम्या

ट्रम्पचा संदेश, मोदींचे सकारात्मक उत्तर… भारत आणि अमेरिका व्यापारातील मतभेद संपणार का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
1

ट्रम्पचा संदेश, मोदींचे सकारात्मक उत्तर… भारत आणि अमेरिका व्यापारातील मतभेद संपणार का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

‘ते म्हणाले नसते तरी मोदी ग्रेटच, भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण…’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानवर फडणवीसांची प्रतिक्रिया
2

‘ते म्हणाले नसते तरी मोदी ग्रेटच, भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण…’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानवर फडणवीसांची प्रतिक्रिया

जागतिक राजकारणाचे वारे नक्की कोणत्या दिशेला? ट्रम्प म्हणाले ‘कायमचे मित्र’, मोदीजींनीही दिले ‘असे’ धडाकेबाज उत्तर
3

जागतिक राजकारणाचे वारे नक्की कोणत्या दिशेला? ट्रम्प म्हणाले ‘कायमचे मित्र’, मोदीजींनीही दिले ‘असे’ धडाकेबाज उत्तर

भारताचे आरोप खरे ठरले; Canada सरकारची कबुली कॅनडाच्या भूमीवरूनच खलिस्तानी दहशतवादाला घातले गेले खतपाणी
4

भारताचे आरोप खरे ठरले; Canada सरकारची कबुली कॅनडाच्या भूमीवरूनच खलिस्तानी दहशतवादाला घातले गेले खतपाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.