दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचा संशय (फोटो- सोशल मिडिया)
दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती
संपूर्ण देशभरात हायअलर्ट जारी
10 पेक्षा जास्त मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी
राजधानी दिल्लीमध्ये एक भीषण स्फोट झाला आहे. लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट झाला आहे. या हल्ल्यात 30 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. तर 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या स्फोटाची तीव्रता भीषण स्वरूपाची होती. प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मेट्रो स्टेशन परिसरात एका धावत्या गाडीत स्फोट झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी एनआयए आणि एनएसजीचे पथके दाखल झाली आहेत. मोठ्या वेगाने तपासाची चक्रे फिरवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या घटनेची माहिती घेतल्याचे समोर आले आहे.
हा स्फोट एवढा भीषण होता की याची तीव्रता किंवा याचा परिणाम हा तब्बल 200 मीटरच्या परिसरात जाणवला आहे. त्यामुळे प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. देशातील आणि राजधानी दिल्लीतील रेल्वे स्थानके, एअरपोर्ट आणि सर्व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी आजच फरीदाबाद येथे एक दहशतवादी कट उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तबल 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. याचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी केला जातो असे माहिती समोर येत आहे. दरम्यान याचा हा हल्ल्याशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.






