Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राष्ट्रपती उभे आहेत आणि तुम्ही…’, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुना फोटो दाखवून पंतप्रधान मोदींना दिले चोख प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "निवडणूक जवळ आली की केंद्र सरकार आणि भाजपला आमचे दोष दिसू लागतात.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 07:02 PM
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुना फोटो दाखवून पंतप्रधान मोदींना दिले चोख प्रत्युत्तर (Photo Credit- X)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुना फोटो दाखवून पंतप्रधान मोदींना दिले चोख प्रत्युत्तर (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • ‘राष्ट्रपती उभे आहेत आणि तुम्ही…’
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुना फोटो दाखवून पंतप्रधान मोदींना दिले चोख प्रत्युत्तर
  • जाणून घ्या काय म्हणाले….
Mamata Attack on PM Modi: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यातील ‘प्रोटोकॉल’ वादावरून आता राजकीय वाद रंगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. “निवडणूक जवळ आली की केंद्र सरकार आणि भाजपला आमचे दोष दिसू लागतात. प्रत्येक वेळी आम्हाला विनाकारण लक्ष्य केले जाते,” अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी आपला संताप व्यक्त केला.

‘इशारा देऊनही आयोजनस्थळ बदलले नाही’

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाबाबत स्पष्टीकरण देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ज्या आयोजनस्थळावरून वाद निर्माण केला जात आहे, त्याबाबत त्यांनी आधीच लेखी आक्षेप नोंदवला होता. “मी पत्राद्वारे आणि सोशल मीडियावरूनही इशारा दिला होता की, नियोजित ठिकाण योग्य नाही. मात्र, राज्य सरकारच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता त्याचे खापर आमच्यावर फोडले जात आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

🔴#BreakingNews | Bengal CM Mamata Banerjee responds to Prime Minister, shows photograph from 2024 LK Advani Bharat Ratna event, accuses PM Modi of disrespecting President Draupadi Murmu as PM was seen seated in the photo while President was conferring award to Mr Advani pic.twitter.com/woEhaaSTWX — Indrajit Kundu | ইন্দ্রজিৎ (@iindrojit) March 8, 2026

“हा राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान…”, प्रोटोकॉल उल्लंघनावरून पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

‘राष्ट्रपती उभ्या आणि पंतप्रधान बसलेले’; फोटो दाखवत साधला निशाणा

राष्ट्रपतींच्या अवमानाचा आरोप करणाऱ्या भाजपला ममता बॅनर्जी यांनी एका जुन्या फोटोचा हवाला देत आरसा दाखवला. लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारत रत्न’ प्रदान करतानाचा फोटो दाखवत त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी आम्हाला राष्ट्रपतींचा सन्मान शिकवत आहेत, पण या फोटोत पहा—देशाच्या राष्ट्रपती उभ्या आहेत आणि पंतप्रधान त्यांच्या समोर आरामात बसलेले आहेत. आदिवासी नेत्याचा आणि राष्ट्रपती पदाचा हा खरा अवमान नाही का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘हक्क मागण्यासाठी मी रस्त्यावर, प्रोटोकॉलसाठी नाही’

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विमानतळावर का गेल्या नाहीत? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. सध्या बंगालमध्ये ‘एसआयआर’ (SIR) मुद्यावरून तृणमूल काँग्रेसचे धरणे आंदोलन सुरू आहे. “मी सध्या लोकांच्या हक्कासाठी कोलकात्यात आंदोलनावर बसले आहे. माझ्यासाठी प्रोटोकॉलपेक्षा जनतेचा संघर्ष महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

महिला शक्तीच्या अपमानाचा आरोप फेटाळला

पंतप्रधानांनी महिला दिनानिमित्त ममता बॅनर्जींवर ‘मातृशक्ती’चा अपमान केल्याचा आरोप केला होता. यावर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणाल्या, “महिलांचा सन्मान कसा करायचा, हे मला कोणाकडूनही शिकण्याची गरज नाही. मी लहानपणापासून ही परंपरा पाळत आले आहे. महिलांच्या हक्कासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे आणि आम्ही असे महिला दिन हजार वेळा साजरे करू.” केवळ मतांच्या राजकारणासाठी पश्चिम बंगालवर हल्ले करणे थांबवावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

CM ममता बॅंनर्जींना राष्ट्रपतींचा अपमान भोवणार? पश्चिम बंगालमध्ये घटनेची गृह विभागाकडून दखल

Web Title: Chief minister mamata banerjee gave a befitting reply to prime minister modi by showing an old photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Kolkata
  • Mamata Banerjee
  • PM Narendra Modi
  • TMC

संबंधित बातम्या

Meloni Earrings: ‘मेरे कानो में है जो बाली!’ मेलोंनीचें झुमके बनले इंटरनेटचे VIRAL सेन्सेशन; कॉमेंट्समध्ये मोदीजींच्या नावाचाच गजर
1

Meloni Earrings: ‘मेरे कानो में है जो बाली!’ मेलोंनीचें झुमके बनले इंटरनेटचे VIRAL सेन्सेशन; कॉमेंट्समध्ये मोदीजींच्या नावाचाच गजर

सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस, चार आयएएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करणार; नाना पटोलेंचा इशारा
2

सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस, चार आयएएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करणार; नाना पटोलेंचा इशारा

Amit Shah : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर
3

Amit Shah : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर

Modi In QUAD: दबाव टाकू नका, मी येतोय! मोदींच्या एका वाक्याने बायडेनही झाले होते चकित; क्वाड स्थापनेचा थरार आता झाला उघड
4

Modi In QUAD: दबाव टाकू नका, मी येतोय! मोदींच्या एका वाक्याने बायडेनही झाले होते चकित; क्वाड स्थापनेचा थरार आता झाला उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.