लेह : लडाखमधील नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या (China) लष्करामधील चर्चेची १६ वी फेरी रविवारी (ता. १६) होणार आहे. आतापर्यंत दोन्ही देशांनी वाटाघाटीवर चर्चा करूनही करार होऊ शकला नाही. रविवारी होणारी चर्चा भारतीय हद्दीत होणार आहे. या चर्चेपूर्वी चिनने येथे ५जी (5G) टॉवर बसवले आहेत.
भारत (India) सतत शांतता आणि स्थिरतेवर भर देत आहे. यासोबतच चकमकीच्या ठिकाणाहून सैन्य मागे घ्यावे, असे भारताचे म्हणणे आहे. त्याचवेळी नियंत्रण रेषेला (LAC) लागून असलेल्या लडाख भागात (Ladakh) राहणारे लोक चीनच्या हालचालींमुळे हैराण झाले आहेत. १२ पैकी १० गावांमध्ये ४जी (4G) नेटवर्क नाही. काही गावांमध्ये २जी (2G) नेटवर्कही नाही; परंतु, चिनने येथे ५जी टॉवर (5G tower) बसवले आहे.
चिनने पॅंगॉन्ग सरोवरावर (Pangong Lake) दोन पूल बांधले आहेत. त्यामुळे चिनी सैन्याचा प्रवेश खूप वाढेल. त्यांना येणे-जाणे सोपे होईल. या पुलाच्या बांधकामामुळे चीनला तोफखानाही सहज उपलब्ध होणार आहे. जर येथे बोगदा बांधला तर तो भारतासाठी खूप फायदेशीर ठरेल. चीन ज्या वेगाने बोगदे, पूल आणि रस्ते बांधत आहे त्यामुळे भविष्यात त्यांच्यासाठी त्रास होऊ शकतो, अशी भीती एलएसीच्या शेजारील भागात राहणाऱ्या लोकांना आहे.