
Abhijeet Dipke, CJP Protest, Delhi Police, Delhi Protest,
Delhi Protest: संसद मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि पोलीस कारवाईनंतर, कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांचे आई-वडील पहिल्यांदाच भूमिका मांडली आहे. संसद भवन परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत मुलाच्या सुरक्षेची चिंता आहे. पण मुलाला आंदोलन मागे घेण्याचा सल्ला आपण देणार नाही, असंही अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांनी म्हटले आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थी आंदोलकांनी हिंसक वर्तन करत पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आंदोलन, पोलिस कारवाई आणि सरकारच्या भूमिकेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
संसद मार्चनंतर अभिजीत दीपके यांचे वडील भगवान दीपके केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. छत्रपती संभाजीनगर येथून दूरध्वनीद्वार बोलताना भगवान दिपके म्हणाले की, “पोलिस कारवाईनंतर मुलाच्या सुरक्षिततेची चिंता वाटत असली तरी आंदोलन मागे घेण्यास सांगणार नाही. हे आंदोलन अभिजीतने स्वतः सुरू केले असून या टप्प्यावर त्याला माघार घेण्याचा सल्ला देता येणार नाही.”
अभिजीत दीपके यांच्या आई अनीता दीपके यांनीही, 18 ते 20 वर्षांच्या विद्यार्थ्यांशी दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक का दिली जात आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. हे विद्यार्थी आपल्या भविष्याबाबत चिंतित असून गेल्या महिनाभरापासून शांततापूर्ण आंदोलन करत होते. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी लाठीमार करण्यात आला, अशी टीका त्यांनी केली. मोबाइलवर कारवाईचे व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यांत अश्रू आल्याचे सांगत, विद्यार्थ्यांशी जे घडले ते अत्यंत वेदनादायक आहे. असंही अनिता दिपके यांनी सांगितलं.
भगवान दीपक म्हणाले की, आंदोलनाविरोधात पोलिसांनी केलेली कठोर कारवाई सरकारचा अहंकार दर्शवते. यापूर्वी या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कधीही लाठीचार्ज झाला नव्हता. सर्व आंदोलक सुशिक्षित विद्यार्थी आहेत आणि त्यांनी हिंसाचार किंवा दंगलीचा मार्ग अवलंबला नाही. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण सुरू होते. पण आता सरकारला आता असे वाटू लागले आहे की त्यांचा पराभव होऊ शकत नाही. जेव्हा एखादे सरकार दीर्घकाळ सत्तेत राहते, तेव्हा अशी मानसिकता तयार होते. दीर्घकाळ सत्तेत राहिल्यानंतर सरकारला कोणी पराभूत करू शकत नाही, अशी मानसिकता निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
भगवान दीपके यांनी शांततापूर्ण आंदोलनावर पोलिस लाठीमार करतील, अशी अपेक्षा कधीच नव्हती. विद्यार्थी सुशिक्षित आणि जबाबदार असून ते कधीही कायदा व सुव्यवस्था बिघडवणार नाहीत, असे सांगून त्यांनी प्रशासनावर हिंसाचार भडकण्यात आला. संसद रोडवर जे घडले ती सरकार पुरस्कृत दंगल असल्याचे दिसत होते. असा आरोपही भगवान दिपके यांनी केला.
सोमवारी सकाळी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJP ने ‘संसद चलो’ मोर्चा काढला.दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत मोठा बंदोबस्त तैनात केला. आंदोलक संसदेकडे निघाल्यानंतर अनेक ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवले. संसदेच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.
लाठीचार्ज, अश्रुधूर आणि झटापटीच्या घटना घडल्या. अनेक आंदोलक आणि काही पोलिस जखमी झाले. अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. विरोधी पक्षातील काही नेत्यांनाही काही काळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. जंतर मंतर येथे २३ दिवसांच्या उपोषणानंतर हा जमाव संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत होता. पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित अनियमिततेवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करत होते. पण या आंदोलनाला मोठे हिंसक वळण मिळाल्यामुळे संपूर्ण दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.