CJP Protest: "मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही..."; जे.पी. नड्डा यांच्या भेटीनंतर सौरभ दास यांची प्रतिक्रिया
CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान, सरन्यायाधीश सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी आज (20 जुलै) केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सौरभ आणि आशुतोष जे.पी नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीदरम्यान, आपण योग्य स्तरावरचर्चा करून यावर तोडगा काढतील, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे, अशी माहिती सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया ट्विटर एक्सवर जारी केली आहे.
सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “मी आणि आशुतोष रांका दुपारी १२ वाजल्यापासून केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आहोत. आम्ही त्यांच्यासमोर आमच्या मागण्या मांडल्या आहेत, ज्यात धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा किंवा त्यांना पदावरून हटवणे यांचा समावेश आहे. जे.पी नंड्डा यांनी आम्हाला योग्य स्तरावर चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे, पण अद्याप कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांततापूर्ण आंदोलक स्वस्थ बसणार नाहीत.”
CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?
सोनम वांगचुक यांना त्यांच्या आंदोलनावर कोणतेही निर्बंध न घालता सोडण्यात यावे.
धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करण्यात यावे किंवा त्यांनी राजीनामा द्यावा.
NEET 2026 परीक्षेची कागदपत्रे फुटल्यामुळे आत्महत्या केलेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी.
‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) दिल्ली पोलिसांकडे शांततापूर्ण आंदोलकांवरील बळाचा वापर तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. सीजेपीचा दावा आहे की त्यांच्या मागण्या रास्त असून त्या भारतातील तरुणांच्या आकांक्षांशी सुसंगत आहेत.
Sonam Wangchuk: लडाखचे ‘बर्फाचे जादूगार’ सोनम वांगचुक; जाणून घ्या त्यांच्या ‘आईस स्तूपा’ची कमाल,
सोमवारी (२० जुलै) दिल्लीत तणावपूर्ण परिस्थिती होती. सीजेपी आणि त्यांच्या मोठ्या संख्येने समर्थकांनी ‘पार्लमेंट चलो’ आंदोलनात भाग घेतला. आंदोलकांनी नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात सरकारकडून जबाबदारीची मागणी केली. अनेक आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला आणि लाठीचार्ज झाल्याचेही वृत्त आहे. जंतर मंतर येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.






