Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. यावर अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधत जरांगे पाटलांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 30, 2026 | 09:23 PM
abhijeet dipke on jarange patil

abhijeet dipke on jarange patil

Follow Us
Follow Us:
  • ‘शिक्षण आणि रोजगार दिला असता तर आंदोलनाची वेळ आली असती का?’
  • अभिजीत दिपके मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार.
  • ‘जंतर-मंतरपेक्षा मोठं आंदोलन होणार’, दिपकेंचा इशारा.
 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या आंदोलनाला विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. समाजातील मुलांना योग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असत्या, तर जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची वेळ आली असती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘जरांगेंसोबत चर्चा करून तोडगा काढा’

एखादी व्यक्ती आंदोलनाचा मार्ग स्वीकारते, तेव्हा तो तिच्यासाठी शेवटचा पर्याय असतो, असं अभिजीत दिपके म्हणाले. सरकारने आंदोलनकर्त्यांना चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याची संधी द्यायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारने तातडीने चर्चा करावी आणि काही ना काही तोडगा काढावा, असं आवाहन दिपकेंनी केलं. आंदोलन लांबवून परिस्थिती अधिक चिघळण्यापेक्षा संवादातून प्रश्न सोडवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘मनोज जरांगे काही चुकीचं मागत नाहीत’

मराठा समाजातील मुलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी जरांगे पाटील भूमिका मांडत असल्याचं दिपके म्हणाले. त्यांच्या मागण्यांकडे केवळ आंदोलन म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक प्रश्न समजून घेण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मनोज जरांगे पाटील यांची आपण लवकरच भेट घेणार असल्याचंही दिपकेंनी सांगितलं. जरांगे दिल्लीपर्यंत आले होते, तर आपणही त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीपर्यंत जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

जंतर-मंतर आंदोलनाचा संदर्भ

अभिजीत दिपके यांनी यावेळी त्यांच्या आधीच्या आंदोलनाचाही संदर्भ दिला. काही परीक्षा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर सरकारकडून अद्याप अपेक्षित निर्णय झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या प्रश्नावरही तोडगा निघालेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारकडून न्यायालयाचा मुद्दा पुढे केला जातो; मात्र आवश्यक यादी दिल्यास त्यावर कार्यवाही करण्याची तयारी असल्याचं सांगितलं जात असतानाही संबंधित यादी दिली जात नसल्याचा दावा त्यांनी केला.

अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, फडणवीस, शिंदेंना दिला इशारा; नेमकं काय घडलं?

‘जंतर-मंतरपेक्षा मोठं आंदोलन होणार’

राज्यात विविध समाजघटकांकडून आंदोलनं सुरू असल्याचा दावा करत दिपकेंनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला.

दरम्यान, आगामी काळात जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबतच इतर प्रश्नांवरील आंदोलनांमुळे राज्यातील वातावरण पुढील काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.

Web Title: Abhijit dipke on manoj jarange patil maratha reservation protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
1

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

CJP Protest Live Updates: अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा
2

CJP Protest Live Updates: अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा

CJP Protest Live Updates:  अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत?  विमानात हायव्होल्टेज ड्रामा
3

CJP Protest Live Updates: अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत? विमानात हायव्होल्टेज ड्रामा

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!
4

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.