
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असून, हिमाचलमध्ये आलेल्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी सादर केलेल्या ठराव पत्रावर चर्चा सुरू आहे. असे असताना मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी भाजप आमदार रीना कश्यप यांना मंत्रिपदाची ऑफर दिली.
लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक मांडण्यात आले होते. या आनंदात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. यामुळे महिला शक्तीला अधिक बळ मिळेल, असे ते म्हणाले.
कोण आहे रीना कश्यप ?
2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 68 आमदारांपैकी रीना कश्यप या एकमेव महिला आमदार निवडून आल्या आहेत. रीना कश्यप सिरमोरच्या पच्छाड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. 2021 मध्ये पहिल्यांदाच त्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत पाच्छाडमधून आमदार झाल्या होत्या.