Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janta Party: ‘ते आपल्या एका चुकीची वाट पाहत आहेत’; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांविषयी झालेल्या चर्चेनंतर युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्याच पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर CJP नावाने डिजिटल मोहीम सुरू केली.

  • By anuradha sagar
Updated On: May 23, 2026 | 02:13 PM
Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, CJP,

Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, CJP,

Follow Us
Follow Us:

Cockroach Janta Party: गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी (Cockroach janta party) सोशल मीडियासह देशभरात जोरदार चर्चेत आहेत. कॉकरोच जतना पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर जणू काही मोठी चळवळच उभी केली आहे. अवघ्या सहा दिवसात कॉकरोच जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांना सातत्याने धमक्याही दिल्या जात असल्याचा त्यांनी केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे.

“कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने काही ठिकाणी निदर्शने केली जाणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. पण या आंदोलनाशी आपला कोणताही संबंध नाही, आपले काही घेणे-देणे नाही. त्यामुळे कॉकरोच पार्टी समर्थकांनी घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन दिपके यांनी केले आहे.

इन्स्टाग्रामवर अभिजीत दिपके यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी आपल्या समर्थकांना आवाहन केले आहे. ” मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, काही लोक कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने आंदोलने करणार आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आपण कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाची घोषणा केलेली नाही. आता आपणे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही. आपल्याला ज्यावेळी आंदोलन करायचे असेल त्यांनी आपण त्यासंबंधीची तयारी करून कॉकरोच जनता पार्टीच्या सर्व समर्थकांना विनंती आहे की, घाईघाईने असा कुठलाही निर्णय घेऊ नका, ज्यामुळे आपल्या चळवळीवर चुकीचा परिणाम होईल. त्यांना कोणतीही संधी देऊ नका, आपल्या एका चुकीचीच सरकार वाट पाहत आहे. त्यांना ती संधी देऊ नका, ही मोठी लढाई आहे आणि आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. माझा हा मेसेज सर्व समर्थकांपर्यंत पोहचवा. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की, सावध रहा, काळजीपूर्वक राहा,

“आज काही ठिकाणी लोक आंदोलने करणार आहेत, मात्र त्यात आपला काहीही संबंध नाही. ज्या लोकांना आपल्यापासून त्रास होत आहे, ते लोक मुद्दामून अशा कृत्यांनी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही शांत राहण्याची वेळ आहे. आपण जे काही करू ते संविधानाच्या चौकटीत राहुन आणि शांततेच्या मार्गाने करू. आपण कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करणार नाही. हे लक्षात राहुद्यात.”

मराठी तरुणाची डिजिटल क्रांती! ‘Cockroach Janta Party‘मागचा चेहरा कोण …

Cockroach Janta Partyचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न

देशभरात चर्चेत असलेल्या ‘Cockroach Janta Party’ या डिजिटल चळवळीला आता मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. अभिजीत दीपके यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. इन्स्टाग्रामवर या डिजिटल मोहिमेच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल २ कोटींच्या पुढे गेल्याचा दावा करण्यात येत असतानाच, अभिजीत दीपके यांचे वैयक्तिक इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, बॅकअप म्हणून तयार करण्यात आलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अधिकृत खाते देखील हटवण्यात आल्याने या डिजिटल मोहिमेच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया खात्यांवर सायबर हल्ल्यांचा धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांच्या खात्यांवर कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे …

‘कॉकरोच जनता पार्टी’ला तरुणांचा उदंड प्रतिसाद

काही दिवसांपूर्वी एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांविषयी झालेल्या चर्चेनंतर युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्याच पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर CJP नावाने डिजिटल मोहीम सुरू केली. व्यवस्थेविरोधातील उपरोधिक पोस्ट, मीम्स, व्हिडिओ आणि युवकांच्या प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कंटेंटमुळे या मोहिमेला देशभरातील तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. अल्पावधीतच या पेजने सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. महागाई, बेरोजगारी, NEET पेपरफुटी, माध्यम स्वातंत्र्य, पक्षांतराचे राजकारण आणि निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्न या मुद्द्यांमुळे युवक या मोहिमेशी जोडले गेल्याचे दिसून आले.

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि …

धमक्यांचे सत्र आणि ‘X’ खात्यावर बंदी

अभिजीत दीपके यांनी त्यांना मिळणाऱ्या धमक्यांबाबत सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खाते भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. या खात्याला सुमारे २ लाख १ हजार फॉलोअर्स होते. यानंतर त्यांनी ‘Cockroach Is Back’ नावाने नवीन खाते सुरू केले. आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांतच या नव्या खात्यालाही लाखो लोकांनी फॉलो करण्यास सुरुवात केली. युवकांमध्ये या मोहिमेबाबत उत्सुकता कायम असल्याचे यावरून दिसून येत आहे.

 

Web Title: Cockroach janta party instagram hacked abhijeet dipke cjp news video statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Central government
  • Cockroach Janta Party
  • National Politics

संबंधित बातम्या

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! महागाई भत्ता 63% वर जाणार? नवीन आकडेवारीतून ‘इतक्या’ वाढीचे संकेत
1

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! महागाई भत्ता 63% वर जाणार? नवीन आकडेवारीतून ‘इतक्या’ वाढीचे संकेत

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला मिळणार PM Kisan योजनेचा 24 वा हफ्ता, ‘ही’ चूक टाळा नाहीतर अडकतील 2000 रुपये
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला मिळणार PM Kisan योजनेचा 24 वा हफ्ता, ‘ही’ चूक टाळा नाहीतर अडकतील 2000 रुपये

Salary Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर ‘सरप्राईज’; काही दिवसांत होऊ शकते मोठी घोषणा
3

Salary Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर ‘सरप्राईज’; काही दिवसांत होऊ शकते मोठी घोषणा

हातमाग क्षेत्राचा कायापालट होणार! केंद्र सरकारकडून ‘हँडलूम हॅकेथॉन २०२६’ ची घोषणा; विणकरांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ
4

हातमाग क्षेत्राचा कायापालट होणार! केंद्र सरकारकडून ‘हँडलूम हॅकेथॉन २०२६’ ची घोषणा; विणकरांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.