Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर
इंस्टाग्रामप्रमाणेच कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील ट्रेंडिंगमध्ये आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स अकाऊंटवरील फॉलोवर्सची संख्या वाढत असतानाच भारतात त्यांचे एक्स अकाऊंट बॅन (Withheld) करण्यात आले. यानंतर अगदी काही वेळातच एक्सवर ‘कॉकरोच इज बॅक’ या नावाने नवीन अकाऊंट सुरु करण्यात आलं. मात्र यादरम्यान अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की, एक्सवर बॅन (Withheld) आणि सस्पेंड यांच्यामध्ये काय फरक आहे? एक्स अकाऊंट कधी बॅन (Withheld) आणि सस्पेंड केलं जातं? याबाबत काय नियम आहेत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Cockroach Janta Party)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जेव्हा कंपनीला जाणवते की एखादे अकाऊंट नियम आणि अटींचे उल्लंघन करत आहे, त्यावेळी संबंधित अकाऊंटवर कारवाई करत अकाऊंट सस्पेंड केलं जाते. अशा परिस्थितीत, संबंधित अकाऊंट कंपनीकडूनच कायमस्वरूपी किंवा तात्पुरते निलंबित केले जाते. हा निर्णय पूर्णपणे एक्सचा असतो.
स्पॅम किंवा खोटे अकाऊंट सुरु करणे, लोकांमध्ये द्वेष पसरवणे, हिंसेला प्रोत्साहन देणं किंवा बाल सुरक्षा आणि कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केल्यास अकाऊंट सस्पेंड केलं जाते. वारंवार नियम मोडल्यास एक्स अकाऊंट कायमस्वरूपी निलंबित केले जाऊ शकते. जेव्हा एक्सकडून एखादे अकाऊंट निलंबित केले जाते, तेव्हा संबंधित अकाऊंटच्या प्रोफाईलवर लिहीले जाते की, अकाउंट सस्पेंड. त्यानंतर हे अकाऊंट जगातील कोठूनही कोणालाही दिसत नाही.
Withheld म्हणजेच अकाऊंट थांबवणे, हा एक देश-विशिष्ट निर्बंध आहे. जेव्हा एखाद्या देशातील सरकार किंवा न्यायालय कायदेशीर आदेश जारी करते, जेव्हा एक्स संबंधित अकाऊंट किंवा केवळ एखादे ट्विट फक्त तेवढ्याच देशापुरते थांबवतो. उर्वरित संपूर्ण जगात अकाऊंट आधीसारखेच सुरु राहते. भारतात आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत, सरकार किंवा न्यायालय ‘X’ ला नोटीस पाठवते.
एक्स या आदेशाचे पालन करत अकाऊंट केवळ भारतात बंद करतो. मात्र उर्वरित जगात हे अकाऊंट आधीसारखेच सुरु राहते. ज्या यूजरचे अकाऊंट Withheld होतं, त्याच्या प्रोफाईलवर भारतात असा मेसेज दिसतो की, ‘अकाउंट विदहेल्ड इन इंडिया इन रिस्पांस तो ए लीगल डिमांड’ म्हणजेच ‘कायदेशीर मागणीच्या प्रतिसादात भारतातील खाते रोखले आहे.’
Ans: ‘Withheld’ म्हणजे एखादे अकाऊंट किंवा पोस्ट विशिष्ट देशात कायदेशीर आदेशानंतर ब्लॉक करणे.
Ans: नियमांचे उल्लंघन, स्पॅम, द्वेषयुक्त पोस्ट किंवा खोटे अकाऊंट चालवल्यास अकाऊंट Suspend केले जाऊ शकते.
Ans: Suspend झालेलं अकाऊंट जगभरात बंद होतं, तर Withheld अकाऊंट फक्त एका देशापुरतं मर्यादित केलं जातं.






