Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janta Party Sansad March Live: अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रात्रभर आंदोलनस्थळी थांबण्याच्या केलेल्या आवाहनानंतर, रविवारी जंतर मंतरवर मोठ्या संख्येने लोक जमले. 'संसद चलो' मोर्चापूर्वी बॅनर लावण्यात आले आणि आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 20, 2026 | 06:48 PM
, Cockroach Janta Party, Parliament March, Abhijeet Dipke, CJP Protest,

, Cockroach Janta Party, Parliament March, Abhijeet Dipke, CJP Protest,

Follow Us
Follow Us:

Cockroach Janta Party Sansad March Live : कॉकरोच जनता पार्टी आज (20 जुलै)  दिल्लीतील संसद भवनावर मोर्चा काढला जाणार आहे.  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेल्यानंतर आज दिवस सीजेपीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आज दिल्लीतील या मोर्चाकडे लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी  सीजेपीच्या संसद मोर्चाला परवानगी नाकारली आहे.त्यामुळे दिल्लीतील वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रात्रभर आंदोलनस्थळी थांबण्याच्या केलेल्या आवाहनानंतर, रविवारी जंतर मंतरवर मोठ्या संख्येने लोक जमले. ‘संसद चलो’ मोर्चापूर्वी बॅनर लावण्यात आले आणि आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

२०,००० लोक जंतर मंतरवर पोहोचले: सीजेपी

सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला की, नियोजित आंदोलनापूर्वी जंतर मंतर आणि त्याच्या आसपास “सुमारे २०,००० लोक” उपस्थित होते.  “जंतर मंतरच्या आत आणि आसपास २०,००० लोक आहेत आणि २० जुलैची तारीख अजून आलेली नाही.” धर्मेंद्र प्रधान- आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. अशी पोस्ट सौरभ दास यांनी केली आहे.

 

The liveblog has ended.
  • 20 Jul 2026 04:57 PM (IST)

    20 Jul 2026 04:57 PM (IST)

    CJP Parliament March LIVE:  आंदोलकांना जंतर-मंतरवरून जबरदस्तीने हटवणार नाही; जे. पी. नड्डा  

    CJP Parliament March LIVE:  कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) शिष्टमंडळ आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मोठी माहिती समोर येत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या तरुण आणि विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून जबरदस्तीने हटवले जाणार नाही, असे आश्वास सरकारकडून देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. प्रशासनाकडून बळाचा वापर करून आंदोलकांना हुसकावून लावले जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच सूत्रांनी दिलेल्या या माहितीमुळे तणाव काहीसा निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 20 Jul 2026 04:27 PM (IST)

    20 Jul 2026 04:27 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: अभिजीत दीपकेंना ताब्यात घेतलेले नाही: दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण 

     कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रशासनाने  फेटाळले आहे. सीजेपी'चे प्रवक्ते सौरव दास यांनी आपल्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता, मात्र पोलिसांनी आता हे स्पष्टीकरण दिले आहे.

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत भूमिका मांडली. पोलिसांनी म्हटले आहे की, "सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा भ्रामक बातम्या पसरवल्या जात आहेत, ज्यामध्ये दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली पोलिसांमार्फत हे स्पष्ट करण्यात येते की, हे सर्व आरोप पूर्णपणे असत्य आणि चुकीचे आहेत."

  • 20 Jul 2026 03:46 PM (IST)

    20 Jul 2026 03:46 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: ‘सीजेपी’चा मोर्चा संसदेजवळ पोहोचताच पंतप्रधान मोदींनी संसद भवन सोडले

    CJP Parliament March LIVE:  कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) वतीने पुकारण्यात आलेला ‘संसद मार्च’ जंतर-मंतरवरून निघून थेट संसदेच्या आवाराजवळ पोहोचताच राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंदोलक संसदेच्या परिसरात दाखल होताच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन सोडल्याची माहिती समोर आली आहे.

  • 20 Jul 2026 02:39 PM (IST)

    20 Jul 2026 02:39 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

    CJP Parliament March LIVE:   कॉकरोच जनता पार्टीचा  मोर्चा संसद भवनाजवळ पोहचला असताना अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली  आहे,

  • 20 Jul 2026 02:37 PM (IST)

    20 Jul 2026 02:37 PM (IST)

    डिंपल यादव सपा खासदारांसोबत जंतर मंतर  

    समाजवादी पक्षाच्या अनेक खासदारांनी दिल्लीत संसद भवनापासून जंतर मंतरपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात डिंपल यादव, इक्करा हसन, प्रिया सरोज आणि सपा पक्षाच्या इतर अनेक खासदारांचा समावेश होता.

  • 20 Jul 2026 02:17 PM (IST)

    20 Jul 2026 02:17 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: संसद परिसरातून काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

    कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा संसंद परिसरात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. संसदेपासून फक्त दिडशे मीटर अंतरावर असलेल्या या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  जंतर मंतर पासून संसद परिसरापर्यंत जवळपास ७५ हजार आंदोलक जमल्याचीही माहिती आहे..

  • 20 Jul 2026 01:38 PM (IST)

    20 Jul 2026 01:38 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: शबाना आझमी, योगेंद्र यादव यांच्या विनंतीनंतर जंतरमंतरवरील नेहासह इतरांचे उपोषण मागे

    CJP Parliament March LIVE:   गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेले नेहा आणि इतर आंदोलकांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर आंदोलकांनी आपले उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.

    या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच, हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी उपोषण मागे घेऊन आरोग्याची काळजी घेण्याची विनंती त्यांनी आंदोलकांना केली. या विनंतीला मान देऊन नेहा आणि तिच्या सहकाऱ्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते लिंबू पाणी प्राशन करून आपले उपोषण अधिकृतपणे मागे घेतले. उपोषण मागे घेतले असले तरी मागण्यांसाठीचा लढा शांततापूर्ण मार्गाने सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

  • 20 Jul 2026 01:28 PM (IST)

    20 Jul 2026 01:28 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: आंदोलकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या

    CJP Parliament March LIVE:    कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक संसदेच्या परिसरात दाखल होऊ लागले आहेत.  ससंदेच्या मुख्य प्रवेश द्वारावर पोलिस आणि सैनिकांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. दुसरीकडे जंतरमंतर विद्यार्थ्यांवर  लाठीचार् केल्याने काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना प्रथमोपचार कऱण्यासाठी देखील कोणतीही मदत पुरवली जात नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

  • 20 Jul 2026 01:14 PM (IST)

    20 Jul 2026 01:14 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: विद्यार्थ्यांचा मोर्चा संसदेवर, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला

    CJP Parliament March LIVE: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक संसद भवनाच्या परिसरात दाखल होऊ लागले आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढत चालल्याचे दिसत आहे. त्याचवेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान गृहमंत्री अमित शाहा यांच्या भेटीला पोहचल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संसदेची दोन मुख्य प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत.

  • 20 Jul 2026 01:10 PM (IST)

    20 Jul 2026 01:10 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: 'सीजेपी'चे शिष्टमंडळ  केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार

    CJP Parliament March LIVE:  "आज सकाळी ११:५२ वाजता आम्ही, म्हणजेच आशुतोष रांका आणि मी स्वतः, 'कॉकरोच जनता पक्षा'च्या (CJP) वतीने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी जात आहोत. आज सकाळीच सरकारने या चर्चेसाठी आमच्याशी संपर्क साधला होता. या बैठकीत मांडल्या जाणाऱ्या आमच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आणि ठाम आहेत. या आंदोलनासाठी सध्या देशातील तरुण अत्यंत मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत," अशी अधिकृत माहिती पक्षाच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

    संसदेवर काढण्यात आलेल्या मार्चच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी सरकार आणि आंदोलक यांच्यात ही अत्यंत महत्त्वाची बैठक होत असून, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • 20 Jul 2026 12:55 PM (IST)

    20 Jul 2026 12:55 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: सीजेपीचा मोर्चा संसदेच्या दारावर धडकला

    CJP Parliament March LIVE: सीजेपीचा मोर्चा संसदेच्या दारावर धडकल्याचीही माहिती समोर आली आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी संसदेच्या परिसरात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांचा लोंढा संंसदेच्या दिशेने पोहचू लागला आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून  विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सीजेपीच्या आंदोलनाला केवळ केरळ भवनापर्यंत परवानगी देण्यात आली होती.

  • 20 Jul 2026 12:52 PM (IST)

    20 Jul 2026 12:52 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजीत दिपकेंनी उपोषण सोडलं

    सोनम वांगचुक यांच्या  विनंतीनंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेंनी उपोषण सोडल्याची माहिती समोर आलीआहे.  आज सकाळी सोनम वांगचुक यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी उपोषण सोडल्याचे बोलले जात आहे.

    #WATCH | Delhi: Moment when the founding president of the Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, ended his hunger strike at Jantar Mantar pic.twitter.com/na3njYX0ZX

    — ANI (@ANI) July 20, 2026

  • 20 Jul 2026 12:31 PM (IST)

    20 Jul 2026 12:31 PM (IST)

    CJP Parliament March LIVE: लोकशाही दडपून टाकणारे सरकार

    लोकतंत्र का दमन करती सरकार।🥺

    संविधान विरोधी लोगों के सत्ता में आने से यही होता है।😳 pic.twitter.com/iShgP5LBqW

    — Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 20, 2026

  • 20 Jul 2026 12:27 PM (IST)

    20 Jul 2026 12:27 PM (IST)

    CJP Parliament March LIVE:  कॉकरोच जनता पक्षाचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेणार

    CJP Parliament March LIVE:  संसदेवरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली असून कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) प्रतिनिधी लवकरच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. स्वतः सरकारनेच या चर्चेसाठी पक्षाशी संपर्क साधला असल्याची माहिती समोर आली आहे.

    या महत्त्वाच्या घडामोडीबाबत अधिकृत दुजोरा देताना पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, प्रशासनामार्फत सरकारकडून त्यांना चर्चेचे निमंत्रण आले आहे. जंतर-मंतरवरील वाढता जनक्षोभ आणि आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेता सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन आंदोलनावर काही तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 20 Jul 2026 12:24 PM (IST)

    20 Jul 2026 12:24 PM (IST)

    CJP Parliament March LIVE:   'मी आता बरा आहे, मला जाऊ द्या'; सोनम वांगचुक यांनी मागितली रुग्णालयातून सुट्टी

    CJP Parliament March LIVE:  "मी आज शारीरिकदृष्ट्या अत्यंत उत्तम अनुभवत असून माझे आरोग्यविषयक सर्व निकष (हेल्थ पॅरामीटर्स) देखील पूर्णपणे सामान्य दिसत आहेत. त्यामुळे आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या 'संसद मार्च - संसद चलो' आंदोलनात मला सहभागी होता यावे, यासाठी मला रुग्णालयातून तात्पुरती का होईना, रजा देण्यात यावी," अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या संचालकांना पत्र लिहून केली आहे.

  • 20 Jul 2026 11:17 AM (IST)

    20 Jul 2026 11:17 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: ५० वर्षांनंतर देशात तरुणांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन'  योगेंद्र यादव

    CJP Parliament March LIVE:  "देशात सुमारे ५० वर्षांनंतर तरुणांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचे मोठे आंदोलन उभे राहिले आहे. शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणणे, ही या आंदोलनाची सर्वात मोठी कामगिरी आहे. आता देशातील राजकारणाला तरुणांच्या या मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील," अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक केलं आहे.  कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) वतीने दिल्लीत काढण्यात आलेल्या संसद मार्चला पाठिंबा दर्शवत त्यांनी या आंदोलनाचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले.

  • 20 Jul 2026 11:02 AM (IST)

    20 Jul 2026 11:02 AM (IST)

    CJP Parliament March LIVE:  सरकारसोबत चर्चा सुरू;   सौरव दास यांना पोलीस उपायुक्त कार्यालयात नेले

    CJP Parliament March LIVE: "आमची सरकारसोबत अधिकृत चर्चा सुरू आहे," अशी माहिती कॉकरोच जनता पक्षाकडून (CJP) देण्यात आली आहे. दरम्यान, संसदेवरील नियोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांना पोलीस प्रशासनाकडून उपायुक्तांच्या (DCP) कार्यालयात नेले जात असल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलन आणि प्रशासनातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने या चर्चेकडे अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

  • 20 Jul 2026 10:54 AM (IST)

    20 Jul 2026 10:54 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: 'आम्ही कोणताही हिंसाचार केला नाही'; दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

    CJP Parliament March LIVE: "जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून हिंसाचार करण्यात आल्याच्या आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडिया तसेच काही प्रसारमाध्यमांवर चालवल्या जात आहेत. मात्र, अशी कोणतीही घटना घडलेली नाही. पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थिती अत्यंत व्यावसायिक आणि संयमी पद्धतीने हाताळत आहे," असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहे.

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर माध्यमांवर पसरणाऱ्या वृत्तांवर पोलिसांनी अधिकृत भूमिका मांडली आहे. पोलिसांनी सर्व नागरिकांना आणि आंदोलकांना कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच जंतर-मंतर आणि परिसरामध्ये शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

  • 20 Jul 2026 10:41 AM (IST)

    20 Jul 2026 10:41 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटेरिएट मेट्रो स्टेशनचे दरवाजे अखेर खुले

    CJP Parliament March LIVE:   कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) जंतर-मंतर येथील संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेले मेट्रो स्टेशनचे दरवाजे आता प्रशासनाने पुन्हा उघडले आहेत. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटेरिएटसह एकूण ५ मेट्रो स्टेशनचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग (एन्ट्री आणि एग्झिट गेट) बंद केले होते.

    परंतु, आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटेरिएट या दोन्ही प्रमुख मेट्रो स्टेशनवरील प्रवासी वाहतूक आणि गाड्या बदलण्याची सुविधा (इंटरचेंज) प्रवाशांसाठी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. मेट्रो स्थानकांचे दरवाजे उघडल्यामुळे प्रवाशांना आणि आम जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 20 Jul 2026 10:38 AM (IST)

    20 Jul 2026 10:38 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: 'केवळ शांतता आणि प्रेमानेच आपण हा लढा जिंकू':  सौरभ दासचे आंदोलकांना आवाहन

    CJP Parliament March LIVE  "तुम्ही सध्या जेथे कुठे असाल, कृपया शांतता राखा! दिल्लीतील अनेक मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासन तुमच्यापैकी काही जणांसाठी अडचणी निर्माण करत आहे. जर तुम्हाला काही ठिकाणी अडवण्यात आले, तरीही संयम सोडू नका आणि शांतता पाळा. आपण हा लढा केवळ शांतता आणि प्रेमाच्या मार्गानेच जिंकणार आहोत," असे आवाहन कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी केले आहे. संसदेवरील नियोजित मोर्चा सुरू होण्यापूर्वी त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आंदोलक आणि समर्थकांना हा शांततेचा संदेश दिला.

  • 20 Jul 2026 10:20 AM (IST)

    20 Jul 2026 10:20 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: जंतरमंतरवर पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

    जंतर मंतर येथे संसद मोर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्याचे समोर आले आहे.  मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज सुरू केल्याचे दिसून येत आहे. क़ॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक संसदेकडे मोर्चा घेऊन निघाले होते. त्याचवेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज सुरू करत सीजेपीचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला.

    #WATCH | Delhi | Protesters gathered for CJP's protest march clash with RPF personnel at Jantar Mantar; RPF personnel & police use lathis for crowd control pic.twitter.com/gijaCjJksW

    — ANI (@ANI) July 20, 2026

  • 20 Jul 2026 10:08 AM (IST)

    20 Jul 2026 10:08 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: : जंतर-मंतरवरून संसदेच्या दिशेने मोर्चा सुरू; गिंताजली आंगमो, प्रकाश राज अभिजीतसोबत 

    CJP Parliament March LIVE:  नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावरून कॉकरोच जनता पक्षाचा (CJP) संसदेवरील नियोजित मोर्चा अखेर सुरू झाला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्ती उपस्थित आहेत. यामध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली, खासदार चंद्रशेखर आझाद आणि प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे स्वतः आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरले आहेत. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलकांचा उत्साह वाढला असून जंतर-मंतर परिसरामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 20 Jul 2026 10:05 AM (IST)

    20 Jul 2026 10:05 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: जंतर-मंतरवर नव्या क्रांतीचा जन्म; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी

    CJP Parliament March LIVE:  "दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर सध्या एका नव्या क्रांतीचा जन्म होत आहे. हे आंदोलन आता केवळ सोनम वांगचुक किंवा 'सीजेपी' (CJP) पुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते या सर्वांच्या खूप पुढे निघून गेले आहे. आता देशातील 'जेन-झेड' (GenZ म्हणजेच आजची नवी पिढी) या आंदोलनाचे नेतृत्व करत असून ते या लढ्याला पुढे नेत आहे. आता हे 'कॉकरोच' उड्डाण घेतील आणि आभाळाला गवसणी घालतील," अशा शब्दांत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी  जंतर-मंतर येथील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

     

    There is a revolution taking birth at Jantar Mantar. It now transcends Sonam Wangchuk and CJP, it is now being driven by India’s GenZ. The Cockroaches will mow fly and soar.

    — 🍉Tushar GANDHI🇵🇸 Manavta Meri Jaat (@TusharG) July 20, 2026

  • 20 Jul 2026 10:00 AM (IST)

    20 Jul 2026 10:00 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: 'प्रशासनाकडून सरकारसोबत चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू'  CJP प्रवक्ते सौरभ दास

    CJP Parliament March LIVE:  "प्रशासन सध्या सरकारसोबत आमची अधिकृत चर्चा सुरू करण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न करत आहे. खरं तर प्रशासनाला हा पुढाकार घेण्यासाठी खूप उशीर झाला आहे, तरीही आम्ही खुल्या मनाने चर्चेला तयार असल्याचे आहोत. मात्र, अद्याप त्यांच्या बाजूने कोणताही स्पष्ट आणि ठोस प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे आता यावर काय भूमिका घ्यायची, याचा अंतिम निर्णय सरकारनेच करायचा आहे," अशी प्रतिक्रीया कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी दिली आहे.

  • 20 Jul 2026 09:56 AM (IST)

    20 Jul 2026 09:56 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: दिल्लीतील आणखी तीन मेट्रो स्टेशनचे 'एग्झिट' बंद

    CJP Parliament March LIVE: कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केली आहे. सेंट्रल सेक्रेटेरिएट मेट्रो स्टेशन पाठोपाठ आता जनपथ, पटेल चौक आणि सेवा तीर्थ या तीन मेट्रो स्टेशनचे बाहेर पडण्याचे मार्ग (एग्झिट) प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. आंदोलकांची गर्दी संसदेच्या दिशेने वाढू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

  • 20 Jul 2026 09:52 AM (IST)

    20 Jul 2026 09:52 AM (IST)

    CJP Parliament March LIVE:जंतर-मंतरवर आंदोलकांची प्रचंड गर्दी;  CJP चा संसद मार्च काही वेळातच सुरू होणार

    CJP Parliament March LIVE : नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सध्या आंदोलकांचा प्रचंड जनसमुदाय गोळा झाला असून 'भारत माता की जय' आणि 'इंकलाब जिंदाबाद' अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. कॉकरोच जनता पक्षाचा (CJP) नियोजित संसद मार्च काही वेळातच सुरू होण्याची शक्यता आहे. जंतर-मंतरवर निर्माण झालेली गर्दी आणि तणावपूर्ण वातावरण पाहता, आंदोलक आणि उपस्थित पोलीस प्रशासनामध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती समोर येत आहे.

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस असल्याने दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या मार्चला परवानगी नाकारली असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत संसदेकडे कूच करण्यावर आंदोलक ठाम असल्याने जंतर-मंतरवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 20 Jul 2026 09:40 AM (IST)

    20 Jul 2026 09:40 AM (IST)

    CJP Parliament March LIVE:  सेंट्रल सेक्रेटेरिएट मेट्रो स्टेशन सर्वसामान्यांसाठी बंद  सेंट्रल सेक्रेटेरिएट मेट्रो स्टेशन सर्वसामान्यांसाठी बंद

    CJP Parliament March LIVE:   'कॉकरोच जनता पक्षा'तर्फे (CJP) आज, २० जुलै रोजी संसदेवर काढण्यात येणाऱ्या नियोजित मार्चच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (DMRC) 'सेंट्रल सेक्रेटेरिएट' (Central Secretariat) मेट्रो स्टेशन आम जनतेसाठी आणि प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद केले आहे. आंदोलनाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

    #WATCH दिल्ली: आज, 20 जुलाई को CJP के संसद तक प्रस्तावित मार्च को देखते हुए सेंट्रल सेक्रेटेरिएट मेट्रो स्टेशन आम जनता के लिए बंद कर दिया गया है।

    दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने ट्वीट किया, "सुरक्षा कारणों से जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटेरिएट और सेवा तीर्थ… pic.twitter.com/m8fpXCagcY

    — ANI_HindiNews (@AHindinews) July 20, 2026

  • 20 Jul 2026 09:18 AM (IST)

    20 Jul 2026 09:18 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा: अभिजीत दिपके

    #WATCH | Delhi: Founding President of the Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, says, "The biggest march in India's history is about to take place. For the past 10-12 years, attempts have been made to destroy democracy in this country. By sitting at Jantar Mantar for a month,… pic.twitter.com/9qjO1ACNtY

    — ANI (@ANI) July 20, 2026

  • 20 Jul 2026 09:10 AM (IST)

    20 Jul 2026 09:10 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: सीजेपीच्या आंदोलनाच्या परिसरात दगडांनी भरलेला ट्रक, व्हिडीओ व्हायरल

    CJP Parliament March LIVE:  कॉकरोच जनता पार्टीचे आज संसद भवनाकडे मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला केवळ केरळ भवन परिसरापर्यंत परवानगी देण्यात आली असली तरी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीजेपी आंदोनलाच्या परिसरात एक दगडांनी भरलेला ट्रक रात्रीपासून उभा असल्याचे सीजेपीच्या आंदोलकांच्या निदर्शनास आले आहे. हा ट्रक कालपर्यंत इथे नव्हता मग रात्रीत तो कसा आणि कुठून आला असा सवाल आता आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे. सीजेपीचा मोर्चाच्या काळात आमच्यावरच दगडफेक करून आंदोलन, मोर्चा मोडीत काढण्यासाठी हा कट तर रचला जात नाहीये ना असा संशयही आंदोलनकांकडून व्यक्त केला  जात आहे.

  • 20 Jul 2026 08:56 AM (IST)

    20 Jul 2026 08:56 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

    CJP Parliament March LIVE: सोमवारी (२० जुलै) आयोजित करण्यात आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे.  आंदोलनाच्या काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी नवी दिल्लीतील सर्व मुख्य प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त तैनात करण्या आला आहे.  या सर्व ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेड्स बसवण्यात आले असून, अधिक संख्येने वाहन तपासणी नाके आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात

    संसद भवन आणि आजूबाजूच्या संवेदनशील परिसराकडे जाणाऱ्या मार्गांवर अतिरिक्त पोलीस दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातूनही देखरेख केली जात आहे. आंदोलकांनी शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून, तपासणीमुळे दिल्लीतील मुख्य रस्त्यांवर काही प्रमाणात वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

  • 20 Jul 2026 08:38 AM (IST)

    20 Jul 2026 08:38 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: प्रकृती खालावलेली असतानाही सोनम वांगचुक यांचे  मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

     CJP Parliament March LIVE: सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सध्या सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रकृती खालावलेली असतानाही, वांगचुक यांनी रुग्णालयातूनच हाताने लिहिलेला एक संदेश जारी केला आहे. सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाचा उल्लेख भारताचे 'दुसरे स्वातंत्र्य आंदोलन' असा केला आहे. देशातील पेपर फुटीसारखे कथित अन्याय आणि 'भयाच्या वातावरणातून मुक्ती' मिळवण्यासाठीची ही लढाई असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

  • 20 Jul 2026 08:34 AM (IST)

    20 Jul 2026 08:34 AM (IST)

    CJP Parliament March LIVE:सीजेपी आंदोलनाच्या स्थळाच्या परिसरात दिल्ली पोलिसांचा  मोठा फौजफाटा तैनात

    कॉकरोच जनता पार्टीच्या ससंद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीजेपीला परवानगी नाकारली असल्यची माहिती समोर आली आहे. त्यानंतरही  सीजेपी आंदोलनाच्या स्थळाच्या परिसरात दिल्ली पोलिसांचा  मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

    #WATCH | दिल्ली: आज, 20 जुलाई को संसद तक प्रस्तावित CJP के मार्च की खबरों के बीच जंतर-मंतर पर भारी सुरक्षा बल और पुलिस बल तैनात है। pic.twitter.com/shAXbuVuLX

    — ANI_HindiNews (@AHindinews) July 20, 2026

  • 20 Jul 2026 08:29 AM (IST)

    20 Jul 2026 08:29 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: " ... तर मी २० जुलै रोजी माझा उपोषण सोडेन"  सोनम वांगचुक यांची पोस्ट  

    कॉकरोच जतना पार्टीच्या आंदोलनात उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ  सोनम वांगचुक यांनी आपला  उपोषण  सोडण्याबद्दल पोस्ट केली. ते म्हणाले, "या मागण्या पूर्ण झाल्यास मी माझा उपवास सोडेन:

    १. शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयश, पेपरफुटी इत्यादींची जबाबदारी सरकारने घ्यावी.

    २. मी आणि सीजेपीचे नेतृत्व संसदेत पोहोचावे आणि विविध पक्षांचे खासदार व नेत्यांनी आम्हाला आश्वासन द्यावे की ते हा मुद्दा संसदेत मांडतील, किंवा

    ३. जर माझी प्रकृती किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मला शक्य झाले नाही, तर विविध पक्षांचे खासदार आणि नेते या रुग्णालयात येऊन वरील आश्वासने देतील."

    त्यांनी आपल्या पोस्टचा समारोप करताना  , "...सफदरजंग रुग्णालयात बेकायदेशीरपणे नजरकैदेत असून इथे माझ्या हालचाली, भाषण आणि संवादाच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत."

  • 20 Jul 2026 08:24 AM (IST)

    20 Jul 2026 08:24 AM (IST)

    CJP Parliament March LIVE: संसद मोर्चापूर्वी अभिजीत दिपकेंची सोशल मीडिया पोस्ट

    संसद मोर्चाच्या तयारीदरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी संविधानाचा एक फोटो शेअर केला. त्यांनी लिहिले, "जय संविधान." या फोटोमध्ये जंतर मंतरवर मोठी गर्दीही दिसत आहे.

    Jai Samvidhan!!!!#ChaloSansad pic.twitter.com/cZj4kgpgBi

    — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 20, 2026

Web Title: Cockroach janta party sansad march live update today abhijit dipke sonam wangchuk marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Sonam Wangchuk
  • Student Protest

संबंधित बातम्या

Supreme Court On CJP Protest: ‘तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात’; संसद मोर्चावरील लाठीमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे खडे बोल
1

Supreme Court On CJP Protest: ‘तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात’; संसद मोर्चावरील लाठीमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे खडे बोल

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
2

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
3

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे आदेश
4

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.