Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही कॉकरोच जनता पार्टीचा आंदोलनाचा इशारा! ‘गुन्हे मागे घ्या, अन्यथा पुन्हा…’

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही विद्यार्थ्यांवरील कारवाईचा मुद्दा कायम असल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारला इशारा दिला आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा उपोषण सुरू करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 27, 2026 | 05:57 PM
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही कॉकरोच जनता पार्टीचा आंदोलनाचा इशारा!

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही कॉकरोच जनता पार्टीचा आंदोलनाचा इशारा!

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांवरील सर्व एफआयआर तात्काळ मागे घेण्याची मागणी
  • अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरित सुटका करण्याचा आग्रह
  • मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा
 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईचा मुद्दा कायम असल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारला पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे. आंदोलकांवर कोणतीही पोलीस कारवाई केली जाणार नाही, या कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा CJP च्या वतीने केला असून, विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलनाला बसावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणण्यानुसार, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दिल्लीसह इतर काही राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून नजर ठेवली जात असून त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीत आंदोलकांना रसद आणि अन्य मदत पुरवणाऱ्या स्वयंसेवकांनाही ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर येत असल्याचा दावा पक्षाने केला आहे.

‘फक्त आंदोलन झाले म्हणून लाठीचार्ज करू शकत नाही’; न्यायालयाची दिल्ली पोलिसांना ‘सर्वोच्च’ फटकार! नेमकं काय घडलं कोर्टात?

‘X’ पोस्टवरून सरकारला इशारा

दरम्यान, पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना टॅग केले आहे. त्यांनी आंदोलकांवरील सर्व एफआयआर तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय, दिल्ली पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणा किंवा भाजपशासित राज्यांतील पोलिसांकडून भविष्यात आंदोलनाशी संबंधित कोणतेही नवीन गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. कायदेशीर प्रकरणांबाबत झालेला लेखी करार आणि भारत सरकारने निश्चित केलेली कालमर्यादा उद्यापर्यंत लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे.

Dear @JPNadda @DrJitendraSingh ji, We are observing a complete breach of the agreement regarding no police action against the protestors. Hundreds of students have been arrested in Bihar and Bengal, and hundreds are being surveilled/harrassed in Delhi and other states. Multiple… — Ashutosh Ranka (@AshutoshRanka) July 27, 2026

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत, जर सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट आणि गर्भित इशारा कॉकरोच जनता पार्टीने दिला आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही या आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल, याकडे देशभरातील विद्यार्थ्यांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लाठीचार्जवरून सर्वोच्च न्यायालयाचा दिल्ली पोलिसांना दणका

देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी कथितरित्या केलेल्या अतिबळाच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, केवळ आंदोलन सुरू आहे म्हणून पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचा अधिकार मिळत नाही. कोणतीही कारवाई करताना परिस्थितीचा सखोल विचार करून कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही टिप्पणी केली. यापैकी एक याचिका विद्यार्थ्यांच्या एका गटाने दाखल केली होती, ज्यात त्यांनी आरोप केला होता की आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना मारहाण केली.

Sonam Wangchuk Discharged: मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनम वांगचुक थेट राजघाटावर; महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

Web Title: Cockroch janata party warning hunger strike student fir withdrawal demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Delhi Police
  • Dharmendra Pradhan

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.