Sonam Wangchuk Discharged: मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनम वांगचुक थेट राजघाटावर
Sonam Wangchuk on Rajghat News: दिल्लीतील २६ दिवसांच्या उपोषणानंतर आणि प्रदीर्घ उपचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सोमवारी दुपारी मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वांगचुक यांनी सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि देशभरातून प्रार्थना करणाऱ्या लोकांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरही भाष्य केलं. Sonam Wangchuk Discharged From Medanta Hospital; Visits Rajghat To Pay Homage To Mahatma Gandhi
दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सोनम वांगचुक पत्नीसह थेट दिल्लीतील राजघाटवर पोहचले. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर थेट राजघाटला भेट देऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. जंतरमंतरवर दाखल होण्यापूर्वी सोनम वांगचुक स्वित्झर्लंडमध्ये होते. स्वित्झर्लंडहून भारतात दाखल झाल्यानंतरही ते राजघाटला गेले होते. त्यानंतरच ते जंतरमंतर मैदानात गेले होते.
” अखेर डिस्चार्जचा दिवस आला आहे. माझी प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. माझ्या शरीरात हळूहळू ताकद परत येत असून प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि एकजुटीमुळे कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन यशस्वी झाले आणि ते सार्वजनिक मुद्द्यांवर आवाज उठवत राहतील. आमचा लढा कोणत्याही एका व्यक्तीसाठी नसून देशातील तरुणांसाठी आणि व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी असलेल्या सर्वांप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, समाजातील सर्व स्तरांतील, तरुण-वृद्ध, जवळचे-दूरचे, देशाच्या विविध भागांतील लोक या मोहिमेत एकत्र आले आणि त्यांनी आपला आवाज उठवला. या जनसमर्थनाने आंदोलनाला बळ दिले आणि त्याचे यश सुनिश्चित केले. हे केवळ एका व्यक्तीचे आंदोलन नव्हते, तर देशभरातील लोकांचा सामूहिक आवाज होता. प्रत्येकजण एका समान उद्देशासाठी एकत्र लढला आणि त्याचे सकारात्मक परिणाम मिळाले.
लोक अशाच प्रकारे सहभागी होत राहतील आणि जनहिताच्या मुद्द्यांवर आवाज उठवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या सर्व समर्थकांना समाल करत ते म्हणाले की, जनतेचा सहभाग ही कोणत्याही लोकशाही चळवळीची सर्वात मोठी ताकद आहे. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून आणि “जय हिंद,” “नमस्ते,” आणि “जुले” म्हणून त्यांनी आपल्या संदेशाचा समारोप केला.
ते म्हणाले, “मला सर्वप्रथम बापूंचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजघाटावर यायचे होते. मला देशाला सांगायचे होते की, त्यांनी दाखवलेला मार्ग १०० वर्षांपूर्वी जितका समर्पक होता, तितकाच तो आजही आहे. लोक म्हणतात की अशा राजवटीत किंवा अशा शासकाच्या अधिपत्याखाली अशा पद्धती चालत नाहीत.”
माझा विश्वास आहे की, अशा पद्धती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. कोणतेही सरकार आंदोलकांचे ऐकले नाही तरी लोकांचे ऐकते. मी गांधीजींचा अनुभव पुन्हा यशस्वी होताना पाहिला. आम्ही तो यापूर्वी लडाखमध्ये वापरला होता. राष्ट्रीय स्तरावर मला त्याबद्दल माहिती नव्हती. मला खात्री वाटली की तो १०० किंवा १००० वर्षांनंतरही समर्पक राहील. मला भारतातील आणि जगातील लोकांना सांगायचे आहे की, बापूंनी दाखवलेल्या मार्गावर त्यांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात. याला वेळ लागू शकतो, पण ही प्रक्रिया हळू होणार नाही.






