Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवणार; फेब्रुवारीपासूनच सुरू होणार उन्हाळा तर जलस्रोतांसमोर मोठं संकट

उन्हाळ्याचे लवकर आगमन आणि हिवाळ्यातील कमी पाऊस यांचा थेट आणि विनाशकारी परिणाम देशातील जलस्रोत आणि रब्बी पिकांवर होणार आहे. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांत आधीच दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 20, 2026 | 09:18 AM
Europe Heयंदा नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवणार; फेब्रुवारीपासूनच सुरू होणार उन्हाळा, जलस्रोतांसमोर संकट

Europe Heयंदा नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवणार; फेब्रुवारीपासूनच सुरू होणार उन्हाळा, जलस्रोतांसमोर संकट

Follow Us
Follow Us:
  • हिवाळ्यात नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवण्याची शक्यता
  • अनेक जुने विक्रम मोडीत निघाले
  • जलाशयांमध्ये केवळ 47 टक्के पाणी शिल्लक
नवी दिल्ली : यंदा हिवाळ्यात नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवण्याची शक्यता असून, उन्हाळ्याची तीव्रताही अपेक्षेपेक्षा लवकर वाढू शकते. ‘एल निनो’च्या वाढत्या प्रभावामुळे फेब्रुवारीपासूनच देशातील तापमानात मोठी होण्याची वाढ शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा नागरिकांना हिवाळ्यात कमी थंडी आणि उन्हाळ्यात लवकरच तीव्र उष्णतेचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

‘क्लायमेट ट्रेंड्’द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी राहील. भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांच्या मते, ‘एल निनो’चा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहील, त्यामुळे फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे, २०२६ मध्ये हवामानाचे अनेक जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. ऑगस्ट २०२६ हा भारतातील (१९०१ पासूनच्या) इतिहासातील सर्वांत उष्ण हा ऑगस्ट ठरला, तर सप्टेंबर २०२६ पाचवा सर्वांत उष्ण सप्टेंबर ठरला.

Weather Update : सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना अखेर दिलासा

दरम्यान, पावसाची कमतरता आणि उन्हाळा लवकर सुरू होत असल्यामुळे भात लागवडीखालील क्षेत्रात १.५५६ दशलक्ष हेक्टरची घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी आणि हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कडधान्ये आणि तेलबियांसारख्या कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या लागवडीला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त, उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासनाने ‘पूर्वसूचना प्रणाली’ अधिक बळकट करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जलाशयांमध्ये केवळ 47 टक्के पाणी शिल्लक

जलसंपत्तीची स्थितीही चिंतेची बाब बनली. केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील १७८ प्रमुख जलाशयांमध्ये पाणीसाठा त्यांच्या सामान्य क्षमतेच्या केवळ ८७.०८ टक्क्यांवर आला आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भागात परिस्थिती अधिकच गंभीर असून, तेथील जलाशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या केवळ ४७.२२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

महाराष्ट्रसह संपूर्ण देशासमोर संकट

उन्हाळ्याचे लवकर आगमन आणि हिवाळ्यातील कमी पाऊस यांचा थेट आणि विनाशकारी परिणाम देशातील जलस्रोत आणि रब्बी पिकांवर होणार आहे. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांत आधीच दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. केवळ महाराष्ट्रातील विचार केल्यास राज्यातील ७५ टक्के भाग दुष्काळाच्या छायेत आहे.

FAQ :

महाराष्ट्रात / तुमच्या भागात काय परिणाम?

– हिवाळा गरमच राहणार असा अंदाज आहे. दिवसा आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी 2027 मध्ये 1.5°C ते 3.5°C तापमान जास्त राहण्याची शक्यता.

शेतकऱ्यांसाठी धोका काय?

– रिपोर्टनुसार, भात, ऊस, कापूस लागवडीचे क्षेत्र आधीच घटलेरब्बी + उन्हाळी पिके – थेट परिणाम – पाण्याची टंचाई

सामान्य लोकांसाठी काय धोका?

Climate Impact Lab च्या अभ्यासानुसार – Super El Niño मुळे जगभरात 4.51 लाख लोकांना याचा फटका बसू शकतो. यापूर्वी भारतातही हीट स्ट्रोकमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Cold will be less intense than usual in this year and summer will begin as early as february nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Climate Change
  • Sunstroke
  • Weather Update

संबंधित बातम्या

COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त
1

COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त

Weather Update : सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना अखेर दिलासा
2

Weather Update : सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना अखेर दिलासा

Weather Update : दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट
3

Weather Update : दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट

Climate Change: 2026 हे ठरणार इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष; शास्त्रज्ञ म्हटले जगासमोर उभं ठाकलं ‘हे’ सर्वात मोठं हवामान संकट
4

Climate Change: 2026 हे ठरणार इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष; शास्त्रज्ञ म्हटले जगासमोर उभं ठाकलं ‘हे’ सर्वात मोठं हवामान संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.