
हमासने भ्याड हल्ला करून शेकडो इस्राइली नागरिकांची हत्या केल्यानंतर इस्त्राइलने गाझा पट्टीतील हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती. गेल्या महिनाभरापासून इस्त्राइलने गाझावर भीषण हल्ला सुरू आहे.
चेन्नई : हमासने भ्याड हल्ला करून शेकडो इस्राइली नागरिकांची हत्या केल्यानंतर इस्त्राइलने गाझा पट्टीतील हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती. गेल्या महिनाभरापासून इस्त्राइलने गाझावर भीषण हल्ला सुरू असून, यात हमासच्या दशतवाद्यांबरोबरच गाझामधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
इस्राइलच्या या कारवाईला विरोधही होत आहे. केरळमधील कासरगोड येथे पॅलेस्टाइन एकजुटता रॅलीमध्ये काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन यांनी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात एक वादग्रस्त विधान केलं आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर कुठलाही खटला न चालवता त्यांची गोळ्या झाडून हत्या केली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.
जर तुम्ही विचारत असाल की, जिनेव्हा कन्व्हेशनच्या सर्व करारांना तोडणाऱ्यांबाबत काय केलं गेलं पाहिजे, तर दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींसाठी नूर्नबर्ग ट्रायल है एक असे पाऊल होते. ज्यानुसार कुठल्याही परीक्षणाशिवाय गोळी मारली पाहिजे. आता वेळ आली आहे की, नूनबर्ग मॉडेलचं परीक्षण केलं गेलं पाहिजे, बेजामिन नेतन्याहू जगासमोर युद्ध गुन्हेगार म्हणून उभे आहेत.
– राजमोहन उन्नीथन, खासदार, काँग्रेस