लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील मुंदडा इंडस्ट्रीजला आज दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत एकजण जखमी झाला असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही… दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या… जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.दरम्यान, मुंदडा इंडस्ट्रीज मध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा साठा बाहेर काढण्यात आला. लातूर शहरात एकीकडे गॅस सिलेंडर साठी नागरिकांच्या मोठ्यात मोठ्या रांगा लावून लावून गॅस सिलेंडरची मिळेल का नाही ही परिस्थिती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत लातूर शहरातील अनेक व्यवसाय गॅस सिलेंडर मुळे बंद पडली असून हे सगळं बघितलं तर या सर्व प्रकरणांमध्ये लातूरचा महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा नेमकं करते तरी काय एवढा मोठा गॅस सिलेंडरचा साठा यांच्यापाशी कुठून आला याची देखील चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीचा सूर लातूरच्या नागरिकाकडून व्यक्त केला जात आहे दरम्यान लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.